लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच अर्थात पुणेकर अगेन्स्ट लाऊडस्पीकर' तर्फे आजच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत. आता सण गोंगाटात नव्हे तर साजरा करूया उत्साहात आनंदात जल्लोषात.*

*लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच अर्थात पुणेकर अगेन्स्ट लाऊडस्पीकर' तर्फे आजच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत. आता सण गोंगाटात नव्हे तर साजरा करूया उत्साहात आनंदात जल्लोषात.*

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने धार्मिक मिरवणुकांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्याची स्वतःहून sumoto दखल घेतली होती.

न्यायालयाचे वकील चिनॉय आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांचे म्हणणे ऐकल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, ते योग्य वेळी सविस्तर आदेश जारी करतील. तथापि, त्यांनी तातडीने अंमलात आणायच्या आदेशात म्हटले आहे:

- आम्ही सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचा आदेश देत आहोत.

- आम्ही मंडळांना मिरवणुकांसाठी दिलेली परवानगी प्रदर्शित करणे अनिवार्य करत आहोत.

- पोलीस आणि इतर सक्षम अधिकाऱ्यांनी अशा मिरवणुकांदरम्यान डेसिबल पातळीची नोंद करून त्याचे नियमन करावे आणि परवानगी असलेल्या डेसिबल मर्यादेपलीकडे आवाज झाल्यास कायद्यानुसार कारवाई करावी.

- आम्ही (ढोल गटांकडून) संगीत वाद्य म्हणून सिलिंडरच्या वापरावरही बंदी घालत आहोत.

पुणेकर अगेन्स लाऊडस्पीकर, अर्थात ' लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंच' याचे स्वागत करून असून पुणेकरांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना आता चपराक बसली आहे. या वादाकडे दुर्लक्ष करा असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री किंवा आम्ही अनिर्बंध सण साजरा करू अशी वल्गना करणाऱ्या नेत्यांना व मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ देणार नाही अशी प्रथम नागरिकास लज्जास्पद भूमिका घेणाऱ्या महापौरांनाही ही फटकार आहे.. गणेश मंडळांनी नेहमीच चांगल्या बदलाचा स्वीकार करणारी भूमिका घेतली आहे. आताही सामान्य पुणेकराच्या आनंदामध्ये मंडळे सामील होतील आणि हे सर्व सण गोंगाटात नव्हे तर आनंदात,उत्साहात साजरी करतील अशी आशा आहे. अश्लील, विभीत्स प्रकारांना पोलीस आळा घालतील अशी आशा आहे. 
या मंचाने उपस्थित केलेले मुद्दे म्हणजे नागपूर ,सोलापूरला जे होऊ शकतं ते पुण्यात का नाही हा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला. तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अनेक ठिकाणी कंत्राटदारामार्फत आवाजाची मोजणी करते परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही. आता मात्र पोलिसांना व संबंधित यंत्रणेला जागेवर तपासणी करून नियंत्रण मिळवावे लागेल. शांतता क्षेत्राबाबतही या मंचाची मागणी ची दखल कोर्टाने घेतल्याचे दिसते. त्या संदर्भात शांतता क्षेत्र नोटिफाय करावीत असे सांगण्यात आले आहे. या सर्वबाबत तपशीलवार आदेश येईल परंतु आता मुख्यत्वे पोलीस आयुक्त, प्रदूषण मंडळ आणि पुणे शहर आयुक्त यांनी यासंदर्भात समन्वयाने पुणेकरांना कर्ण कर्कश्य आवाजाच्या त्रासापासून मुक्त करायचे आहे.
मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणाऱ्या आणि ' जबरदस्तीच्या कर्णकर्कश्य आवाजाला' लगाम लावून मागणाऱ्या पुणेकरांच्या यशाचा पहिला टप्पा आहे.

- मुकुंद किर्दत 
लाऊडस्पिकरविरोधी पुणेकर मंच. PUNEKARS against LOUDspeakers

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*