भारती बँक ही सामान्यांना कर्ज पुरवठा करणारी आर्थिक लोकसंस्था : डॉ.विश्वजीत कदम

* भारती बँक ही सामान्यांना कर्ज पुरवठा करणारी आर्थिक लोकसंस्था : डॉ.विश्वजीत कदम*

*भारती सहकारी बँकेच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १२% लाभांश जाहीर*


पुणे दि.२७ : ग्राहक सेवा हेच बँकेचं अंतिम ध्येय असून भारती बँक ही सामान्यांना कर्ज पुरवठा करणारी आर्थिक लोकसंस्था आहे असे प्रतिपादन भारती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. भारती सहकारी बँकेच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष डॉ.सचिन वेर्णेकर, संचालक सागर कदम, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. अनंत शिंदे, संजय पेंढारकर, डॉ. प्रदीप जाधव, संचालिका सौ. ऐश्वर्या हार्डीकर, सौ. पूजा नरवाडकर यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.

डॉ.कदम पुढे म्हणाले, डॉ.पतंगराव कदम यांनी भारती बँकेची स्थापना अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य माणसास अर्थसहाय्य करण्यासाठी केली आहे. त्यामुळे आज समाजात सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळख आहे. ग्राहकांना अद्ययावत सुविधा देऊन त्यांना समाधानी ठेवावे लागेल. बँकिंग क्षेत्रामधील चालूघडामोडीवर लक्ष ठेऊन आत्मपरीक्षण करून येणारी नवी आव्हाने पेलण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. बँकेचे चेअरमन डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेऊन पुढील ध्येय धोरणांचा आराखडा मांडला. यावेळी बँकेच्या २३ शाखेतून उत्कृष्ट शाखा, परिसर स्वच्छ ठेवणारी शाखा , उत्कृष्ट अधिकारी, लिपिक व सहाय्यक सेवक यांचा सन्मान करण्यात आला.
 व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव पाटील यांनी अहवाल वाचन केले. भारती बँक ही मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक असून आर्थिक वर्ष २०२५ -२६ अखेर बँकेचा व्यवसाय रु २७९०.१२ कोटी असून ढोबळ नफा रु २३.२९ कोटी तर निव्वळ नफा रु १४.५३ कोटी झाला असून निव्वळ NPA शून्य टक्के राखण्यात बँकेने यश मिळविले असून गेल्या दोन वर्षांपासून १२% लाभांशाची परंपरा बँकेने कायम ठेवली आहे. तसेच यावर्षीपासून बँकेने मोबाईल बँकिंग व यूपीआय सेवा ग्राहकांना दिली असून मोबाईल बँकिंग सेवा यशस्वीपणे सुरू आहे. तसेच अंबक व शिवडी या शाखांचे नूतनीकरण करून आधुनिक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.वैधानिक लेखापरीक्षणामध्ये बँकेने 'अ' दर्जा प्राप्त केला आहे. यावेळी बँकेचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष डॉ. सचिन वेर्णेकर यांनी केले तर संचालक प्रा. मिलिंद जोशी यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*