नूमविप्रशालेत गणेशोत्सव उत्साहात . . . नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि नूतन मराठी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
नूमविप्रशालेत गणेशोत्सव उत्साहात . . .
नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि नूतन मराठी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
या मंगलमय सोहळ्याची शोभा अधिकच खुलून दिसली ती तीनही विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिधान केलेल्या पारंपरिक वेशभूषेमुळे आणि सर्वांनी बांधलेल्या केशरी रंगाच्या फेट्यांमुळे!
एकसंध वेशभूषेत सजलेला संपूर्ण शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्ग म्हणजे जणू एकतेचे, संस्कृतीचे आणि आपल्या शाळेच्या अभिमानाचे सुंदर प्रतीकच वाटत होते.
मंगलमय आरती प्रशालेच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. श्री. रामदास वैष्णव व त्यांच्या पत्नी यांच्या शुभहस्ते भक्तिभावाने संपन्न झाली. त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष मंगलमयता लाभली.
हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी तीनही विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग, उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध कार्य आणि परस्पर सहकार्याची भावना दाखवली. प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडल्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
या सोहळ्यासाठी शाला समिती अध्यक्ष माननीय श्री . पराग ठाकूर साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले . प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती संगीता काळे , नूमवि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा कांगणे , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती हेंद्रे ,पर्यवेक्षक सुषमा
तुरबतमठ, श्री बा .दा. खरात,स्नेहसंमेलन कार्याध्यक्षा सौ . मेधा - साखरे,शिक्षक प्रतिनिधी सौ . वंदना वेताळ,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ . रोहिणी माळी ,चित्रकला विभाग प्रमुख श्री . दत्तात्रय वेताळ, श्री . सचिन रोणे तसेच
Comments
Post a Comment