महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्य मंडळाचा ९९ वा वर्धापन दिन साजरा "

" महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्य मंडळाचा ९९ वा वर्धापन दिन साजरा "
महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ पुणे 30 या संस्थेचा 99 वा वर्धापन दिन आनंदाने उत्साहाने चार सप्टेंबर श्रीकृष्ण जयंती निमित्त साजरा करण्यात आला. ही संस्था पुढील वर्षी 100 वर्षात पदार्पण करणार आहे. यानिमित्त संस्थेने संपूर्ण शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना विविध 100 कार्यक्रम घेण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम शैक्षणिक सामाजिक दृष्टीने फार महत्त्वाचे असणार आहेत. 
 नकताच दिनांक 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त संस्थेच्या कॅम्पसमध्ये हा उत्सव सर्व शाखांच्या शिक्षक मुख्याध्यापक पेट्रोन आप्तेष्ट हितचिंतक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रम दरम्यान संस्थेचे आदरणीय सचिव श्री. प्रसाद मारोतराव आबनावे सरांची 61 वी सर्वांच्या उपस्थित आनंदाने सादरी करण्यात आली. त्यांना संस्थेच्या वतीने मानपत्र व ट्रॉफी शाल देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे मानद अध्यक्ष आदरणीय मोहनदादा जोशी संस्थेचे सचिव श्री प्रसाद मारोतराव आबनावे संस्थेचे खजिनदार श्री प्रथमेश विकास आबनावे सर सहसचिव श्री पुष्कर प्रसाद आबनावे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते. 
संस्थे कडून विशेष पुरस्कार संस्थेचे खजिनदार श्री प्रथमेश विकास आबनावे सर व संस्थेचे सहसचिव श्री पुष्कर प्रसाद आबनावे सर यांना देण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सर्व शाखांचे शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांना विशेष पुरस्कार देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*