अॅमवेचा आयुर्वेदातील विस्तारासह भारताच्या विकसित भारत दृष्टिकोनाला पाठिंबान्युट्रिलाइट आयुर्वेद अंतर्गत नवीन उत्पादनांची श्रेणी लाँच; पुढील दोन वर्षांत या श्रेणीचा आकार १०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प

अॅमवेचा आयुर्वेदातील विस्तारासह भारताच्या विकसित भारत दृष्टिकोनाला पाठिंबा

न्युट्रिलाइट आयुर्वेद अंतर्गत नवीन उत्पादनांची श्रेणी लाँच; पुढील दोन वर्षांत या श्रेणीचा आकार १०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प

जबाबदार स्रोतांकडून खरेदी आणि स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यापासून ते अॅमवे इंडियाच्या तामिळनाडूतील कारखान्यात उत्पादनापर्यंत सर्व स्तरांवर मेक इन इंडिया दृष्टिकोनाला पुढे नेणाऱ्या व्यापक आर्थिक मूल्य साखळीत योगदान.
न्युट्रिलाइट आयुर्वेद हे ५,००० वर्षे आयुर्वेद ज्ञान आणि ९० वर्षांच्या न्युट्रिलाइट बोटानिकल सायन्सचे संयोजन आहे.
 

New Delhi, 2nd September, 2026 - भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्राधान्यक्रमांशी आणि विकसित भारत २०४७ दृष्टिकोनाशी सुसंगत पाऊल उचलत अॅमवे इंडिया या आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रातील अग्रणी कंपनीने आज न्युट्रिलाइट आयुर्वेद लाँच करून आयुर्वेदात महत्त्वपूर्ण धोरणात्मक विस्ताराची घोषणा केली आहे. वनस्पतींवर आधारित आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला मिळणारी वाढती मागणी, तसेच केंद्र सरकारच्या आयुष परिसंस्थेला दृढ करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, कंपनीने या श्रेणी अंतर्गत नऊ नवीन आयुर्वेदिक उत्पादने लाँच केली आहेत. पुढील दोन वर्षांत न्युट्रिलाइट आयुर्वेद श्रेणीचा विस्तार १०० कोटी रूपयोपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या न्युट्रीसर्ट-प्रमाणित शेतांमधून जबाबदारीने मिळवलेल्या वनौषधींचा वापर करून ही उत्पादने विकसित करण्यात आली आहे, त्यांचे उत्पादन तामिळनाडूतील अॅमवेच्या अत्याधुनिक कारखान्यात केले जात आहे.हे लाँच केवळ अॅमवे इंडियाच्या वेलनेस पोर्टफोलिओचा विस्तार नाही, तर भारतातील आयुर्वेदाशी संबंधित व्यापक आर्थिक मूल्य साखळीत, म्हणजेच जबाबदार शेती, स्थानिक कृषी क्षेत्राला पाठिंबा, उत्पादन, वैज्ञानिक संशोधन, नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीमध्ये योगदान देण्याची मोठी संधी आहे. न्युट्रिलाइटच्या ९० वर्षांहून अधिक काळाच्या वनस्पती शास्त्रातील (बोटानिकल सायन्स) अनुभवाची आणि गेल्या दशकातील स्थानिक उत्पादन क्षमतेची सांगड घालून अॅमवे इंडिया आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक प्रमाणीकरणाची जोड देत आहे. यातून मेड इन इंडिया संकल्पना साकारत भारताचे पारंपारिक वेलनेस तंत्र जागतिक स्तरावर नेण्याची क्षमता निर्माण होत आहे.

या लाँच प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅमवे इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. रजनीश चोप्रा म्हणाले, "सरकारच्या आयुष परिसंस्थेला दृढ करण्याच्या आणि आयुर्वेदाला देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा मुख्य भाग बनवण्याच्या दूरदृष्टीमुळे भारतातील पारंपारिक वेलनेस क्षेत्रात मोठा बदल घडून येत आहे. यामुळे भारतात आयुर्वेदाच्या विकासासाठी आणि आयुर्वेदाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी प्रबळ पाया तयार होत आहे. तसेच, भारत आयुर्वेद-आधारित नाविन्यता आणि उत्पादनात आपली क्षमता वाढवत असताना ही वाढती परिसंस्था नवीन आर्थिक संधी निर्माण करून भारताला पारंपारिक वेलनेसचे जागतिक केंद्र बनवण्यास मदत करेल. हा वेग अॅमवे इंडियाच्या विकासाच्या पुढील अध्यायाशी आणि विकसित भारत २०४७ च्या उद्दिष्टातील आमच्या सहभागाशी जुळणारा आहे. आयुर्वेदातील प्रचंड क्षमतेवर असलेल्या आमच्या विश्वासातून आम्ही पुढील दोन वर्षांत न्युट्रिलाइट आयुर्वेद श्रेणी १०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवले आहे. न्युट्रिलाइटच्या ९० वर्षांहून अधिक काळाचा वनस्पती शास्त्राचा वारसा आणि वैज्ञानिक प्रमाणीकरणाच्या जोरावर अॅमवे इंडिया भारताच्या आयुर्वेदाच्या धोरणात्मक आराखड्यात योगदान देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे."

"आजचे ग्राहक वेलनेससाठी दैनंदिन पर्याय म्हणून आयुर्वेदाचा अधिक स्वीकार करत आहेत. पण, त्यासोबत त्यांना आधुनिक वेलनेस उत्पादनांकडून अपेक्षा असते तशी पारदर्शकता, सातत्य आणि वैज्ञानिक प्रमाणीकरण देखील पाहिजे. न्युट्रिलाइटमध्ये आमचा विश्वास आहे की, आम्ही देणाऱ्या सुविधांमध्ये विश्वास हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. न्युट्रिलाइट आयुर्वेदासाठी, ‘प्रत्येक वनस्पतीची एक गाथा असते. ती खरी आहे याची आम्ही खात्री देतो' ही केवळ एक घोषणा नाही. ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाची गुणवत्ता आणि त्याचा उगम स्पष्ट असावा, याबद्दलची आमची कटिबद्धता यातून दिसून येते, ज्यामुळे ग्राहक अधिक विश्वासाने आयुर्वेदाचा स्वीकार करू शकतील," असे ते पुढे म्हणाले.या लाँचच्या पहिल्या टप्प्यात तीन आयुर्वेदिक उत्पादने आणली जातील - यकृताचे कार्य उत्तम ठेवण्यासाठी कालमेघ; अतिरिक्त चरबी आणि सूज कमी करण्यास मदत करणारे शिग्रू (शेवगा); आणि चयापचय व भूकेचे संतुलन सुधारण्यासाठी वृक्षाम्ल (गोरखचिंच).

आजचा ग्राहक आरोग्याच्या बाबतीत समस्येनंतर उपचार घेण्याऐवजी आधीपासून काळजी घेण्याला प्राधान्य देत आहे. तसेच घटकांचा उगम, त्यांची कार्यक्षमता आणि अस्सलतेबाबत पूर्ण पारदर्शकतेची मागणी करत आहे. या श्रेणीच्या केंद्रस्थानी न्युट्रिलाइट आहे, ज्याने ९० वर्षांहून अधिक काळ निसर्ग आणि विज्ञानाचा उत्तम मेळ साधला आहे. न्युट्रिलाइट आयुर्वेदासह हा वारसा आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाशी जोडला जात आहे, ज्यामुळे विश्वास आणि पारदर्शकतेची गरज पूर्ण होईल.

ही उत्पादने न्युट्रीसर्ट-प्रमाणित सेंद्रिय शेतांमधून जबाबदारीने मिळवलेल्या अस्सल आयुर्वेदिक वनस्पतींपासून तयार केली आहेत. हे शाश्वत शेती आणि जबाबदार खरेदीप्रती न्युट्रिलाइटची निरंतर बांधिलकी दर्शवते. न्युट्रिलाइटचे आरअँडडी आणि वैज्ञानिक प्रमाणीकरणाच्या आधारे प्रत्येक उत्पादन कठोर गुणवत्ता प्रक्रियेद्वारे तपासले जाते. यामध्ये डीएनए फिंगरप्रिंटिंग, सक्रिय घटक चाचणी आणि बियाण्यापासून ते पुरवठ्यापर्यंतची माहिती तपासणे यांचा समावेश आहे, ज्यामुळे उत्पादनाची अस्सलता, सातत्य आणि पारदर्शकता सुनिश्चित होते. याव्यतिरिक्त दूषित घटक, जड धातू, सूक्ष्मजीव सुरक्षा आणि मुख्य घटकांच्या सातत्यासाठी या उत्पादनांची बहु-स्तरीय सखोल चाचणी घेतली जाते. न्युट्रिलाइटकडून ग्राहकांना अपेक्षित असलेली गुणवत्ता, अस्सलता आणि सातत्य देण्यासाठी ही चाचणी मूलभूत सरकारी नियमांच्याही पुढे जाऊन केली जाते.

या पोर्टफोलिओमध्ये आयुष-नोंदणीकृत उत्पादनांचा समावेश आहे, ज्यामुळे नियामक चौकटीचे पालन करून उत्पादने विकसित करण्याच्या अॅमवे इंडियाची कटिबद्धता अधिक दृढ होते. यामुळे ग्राहकांचा उत्पादनांची गुणवत्ता आणि अस्सलतेवर अधिक विश्वास निर्माण होतो.

हे लाँच या श्रेणीतील कंपनीच्या आधीच्या न्युट्रिलाइट च्यवनप्राशच्या यशानंतर करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*