महिंद्राची ब्लेजो आय-टीआरके: भारतातील फायदेशीर आणि इंटेलिजंट ट्रकिंगसाठी नवीन मानक प्रस्थापित
महिंद्राची ब्लेजो आय-टीआरके: भारतातील फायदेशीर आणि इंटेलिजंट ट्रकिंगसाठी नवीन मानक प्रस्थापित
‘प्रॉफिट का रॉकेट’ - कमाई जास्तीत जास्त वाढवणारे, उत्पादकता सुधारणारे, ऑपरेटिंग खर्च कमी करणारे आणि बुद्धिमत्तापूर्वक अधिक नियंत्रण देणारे भारतातील पहिले हेवी कमर्शियल वेईकल.
उद्योगातील पहिल्या ४८-तासांच्या अपटाईम गॅरंटी* सह आणि पाच वर्षांत प्रति ट्रक १५ लाख रूपयांपर्यंत अतिरिक्त नफा देण्याच्या क्षमतेसह फायदेशीर व बुद्धिमत्तापूर्ण ट्रकिंगचा नवीन मापदंड प्रस्थापित.
सातत्याने जास्तीत-जास्त इंधन बचत प्रदान करणाऱ्या पेटंट-प्राप्त एआय-सक्षम आयफ्यूअलस्मार्ट ऑटो ड्राईव्ह मोडसह भारतातील सर्वात बुद्धिमान ट्रक.
श्रेणीतील सर्वोत्तम इंधन बचत आणि कामगिरीसाठी ऑप्टिमाइझ केलेल्या महिंद्राच्या नेक्स्ट-जनरेशन ३२० एचपी एमपावर इंजिनद्वारे समर्थित संपूर्ण श्रेणी.
फ्लीट मालकांसाठी रिमोट इग्निशन इनहिबिट आणि एसी वापर नियंत्रणासारख्या वैशिष्ट्यांसह सर्वात बुद्धिमत्तापूर्ण - आयमॅक्स २.० प्रगत फ्लीट टेलिमॅटिक्स सोल्यूशनसह उपलब्ध.
पुणे, सप्टेंबर ३, २०२६: महिंद्रा ट्रक अँड बस या महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीने आज नवीन ब्लेजो आय-टीआरके लाँच करण्याची घोषणा केली. हा नेक्स्ट-जनरेशन हेवी कमर्शियल ट्रक ट्रान्सपोर्टर्स आणि फ्लीट मालकांसाठी एकाच मुख्य आश्वासनासह डिझाइन केला आहे - प्रॉफिट का रॉकेट.
केवळ एक ट्रक नसून एक पूर्ण व्यावसायिक सोल्यूशन म्हणून विशेषतः डिझाइन केलेला ब्लेजो आय-टीआरके श्रेणीतील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, उच्च-कामगिरी पॉवरट्रेन, बुद्धिमत्तापूर्ण कनेक्टेड तंत्रज्ञान आणि उद्योगातील आघाडीची अपटाईम गॅरंटी यांना एकत्र आणतो. हे ग्राहकांना कमाई जास्तीत-जास्त वाढवण्यास, उत्पादकता सुधारण्यास, ऑपरेटिंग खर्च कमी करण्यास आणि त्यांच्या फ्लीटवर अधिक नियंत्रण ठेवण्यास सक्षम करते.
ब्लेजो आय-टीआरके ग्राहकांच्या तीन महत्त्वाच्या आश्वासनांवर आधारित डिझाइन करण्यात आला आहे:
अधिक कमवा
१० टक्क्यांपर्यंत उत्तम इंधन कार्यक्षमता प्रदान करणारा ब्लेजो आय-टीआरकेमध्ये इंधनाच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत-जास्त फायदा मिळवण्यासाठी एआय-सक्षम आयफ्यूअलस्मार्ट ऑटो ड्राईव्ह मोड, टर्बोमॅक्स टर्बोचार्जर, ऑप्टिफ्यूअल एअर कॉम्प्रेसर आणि इतर अनेक हार्डवेअर सोल्यूशन्स व सॉफ्टवेअर नाविन्यतांसह प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही एकत्रित बचत पाच वर्षांत प्रति ट्रक १५ लाख रूपयांपर्यंतच्या* अतिरिक्त नफ्यात रूपांतरित होऊ शकते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचा व्यवसाय वेगाने वाढवण्यास मदत होते.*
अधिक चालवा
संपूर्ण ब्लेजो आय-टीआरके श्रेणीमध्ये महिंद्राच्या विश्वासार्ह आणि श्रेणीतील सर्वोत्तम ३२० एचपी एमपावर इंजिनद्वारे समर्थित, हा ट्रक दमदार कामगिरी, उच्च विश्वासार्हता आणि अधिक उत्पादकता प्रदान करतो कॉम्फिमॅक्स सस्पेंडेड सीट, इझीक्रूझ क्रूझ कंट्रोल, हँड्सफ्री आणि सुरक्षित संवादासाठी माईकसह ब्लूटूथ-सक्षम म्युझिक सिस्टम, प्रशस्त, प्रीमियम आणि एर्गोनॉमिक एसी केबिनद्वारे चालकाच्या वाढलेल्या सोयीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात चालकांची कार्यक्षमता टिकून राहते; ज्यामुळे फ्लीटला अधिक कार्यक्षमतेने जास्त फेऱ्या पूर्ण करणे शक्य होते.
प्रत्येक ब्लेजो आय-टीआरकेला वाहनाची उपलब्धता जास्तीत-जास्त वाढवण्यासाठी आणि ऑपरेटिंग खर्च कमी करण्यासाठी डिझाइन केलेल्या महिंद्राच्या सर्वसमावेशक सेवा आश्वासन उपक्रमाचे पाठबळ लाभले आहे. याच्या केंद्रस्थानी उद्योगातील पहिली ४८-तासांची अपटाईम गॅरंटी* आहे, ज्या अंतर्गत ४८ तासांच्या* वचनबद्ध वेळेत वाहन पुन्हा रस्त्यावर न आल्यास ग्राहकांना दररोज १०,००० रूपये* मिळतील. याला राष्ट्रीय महामार्गांवर ७५ किमीच्या आत आणि राज्य महामार्गांवर ५० किमीच्या आत असलेल्या सर्व्हिस सेंटर्सच्या देशभरातील वाढत्या जाळ्याचे आणि महिंद्रा क्विक सर्व्हिस पॉइंट्सचे (एमक्यूएसपी) पाठबळ आहे.
या प्रस्तावाला अधिक दृढ करणारी महिंद्राची पार्ट्स सप्लाय गॅरंटी* आहे, जी डीलर नेटवर्कवर २५० महत्त्वाच्या सुट्या भागांची* उपलब्धता सुनिश्चित करते. पात्र गॅरंटीड पार्ट वचनबद्ध २४ तासांच्या कालावधीत उपलब्ध न झाल्यास, ग्राहक तो संबंधित पार्ट मोफत* मिळण्यास पात्र असेल. हे १०० हून अधिक पार्ट्सवर श्रेणीतील सर्वोत्तम वॉरंटी देखील प्रदान करते.
अधिक नियंत्रण ठेवा
ब्लेजो आय-टीआरके महिंद्राच्या आयमॅक्स २.० या नेक्स्ट-जनरेशन कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्मने
Comments
Post a Comment