आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीकडून भारतातील पहिला बीएसई टोटल मार्केट इंडेक्स फंड आणि ईटीएफ लाँच
आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीकडून भारतातील पहिला बीएसई टोटल मार्केट इंडेक्स फंड आणि ईटीएफ लाँच
एनएफओ ३० सप्टेंबर २०२६ ते १४ ऑक्टोबर २०२६ या काळात खुला राहणार असून, विविध बाजार भांडवल श्रेणी आणि क्षेत्रांमध्ये पसरलेल्या भारतीय शेअर बाजारात व्यापक सहभागाची संधी यातून गुंतवणूकदारांना मिळणार आहे
मुंबई, २९ सप्टेंबर २०२६: आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडची (एबीएसएलएएमसी) स्थापना १९९४ मध्ये झाली. आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि सन लाइफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट्स इन्क. या कंपनीच्या प्रवर्तक आणि प्रमुख भागधारक आहेत. भारतीय विश्वस्त कायदा, १८८२ अंतर्गत नोंदणीकृत ट्रस्ट असलेल्या आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाची ही एएमसी प्रामुख्याने गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम पाहते. आदित्य बिर्ला सन लाइफ बीएसई टोटल मार्केट इंडेक्स फंड आणि आदित्य बिर्ला सन लाइफ बीएसई टोटल मार्केट ईटीएफ लाँच करत असल्याची घोषणा तिने केली आहे. या योजनांचा एनएफओ ३० सप्टेंबर २०२६ पासून १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत खुला असेल. एकाच, व्यापक पॅसिव्ह पर्यायाद्वारे भारतीय शेअर बाजारात उतरण्याचा नवा मार्ग यामुळे उपलब्ध होत आहे.
बीएसईवरील समभागांवर आधारित पहिला टोटल मार्केट निर्देशांक या निमित्ताने दाखल होत असून, त्यामुळे पॅसिव्ह गुंतवणुकीच्या पर्यायांची व्याप्ती वाढली आहे. बाजाराचा कोणता भाग निवडायचा याचा विचार करण्याऐवजी संपूर्ण बाजारात सहभागी होण्याची संधी हा फंड देतो. शेअर बाजार विविध बाजार भांडवल श्रेणी, क्षेत्रे आणि गुंतवणूक शैलींमध्ये विस्तारलेला आहे. अशा वेळी पॅसिव्ह पद्धतीने बाजाराचा मोठा हिस्सा पोर्टफोलिओत सामावून घेण्याची संधी या योजना देतात.
या दोन्ही योजना बीएसई टोटल मार्केट इंडेक्सचा मागोवा घेतील. त्यामुळे लार्ज, मिड, स्मॉल आणि मायक्रो कॅप श्रेणींमधील भारताच्या एकूण बाजार भांडवलापैकी सुमारे ९३ टक्के भाग गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत येईल. बीएसई ऑलकॅप इंडेक्सच्या बाजार भांडवलापैकी ९८ टक्के वाटा असलेले समभाग या निर्देशांकात आहेत. किमान १,००० समभागांची अट असली तरी घटक समभागांच्या संख्येवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. परिणामी एकाच व्यवहारातून मोठ्या संख्येने कंपन्यांपर्यंत पोहोचणे शक्य होते.
बीएसई टोटल मार्केट इंडेक्स भारतीय शेअर बाजारासोबत विकसित होण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. जून आणि डिसेंबर अशी वर्षातून दोनदा त्याची फेररचना होते, तर घटक समभागांचे भारांक फ्री-फ्लोट समायोजित बाजार भांडवलाच्या आधारे ठरवले जातात. लार्ज कॅपमध्ये ५६ टक्के, मिड कॅपमध्ये २० टक्के, स्मॉल कॅपमध्ये १० टक्के आणि मायक्रो कॅपमध्ये ७ टक्के वाटा असल्याने विविध बाजार श्रेणींमध्ये वैविध्य साधले जाते. वित्तीय सेवा, भांडवली वस्तू, आरोग्यसेवा, वाहन उद्योग, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी, ग्राहक सेवा, धातू व खाणकाम, दूरसंचार आणि ऊर्जा यांसह २२ क्षेत्रांचा यात समावेश आहे.
या योजनांच्या लाँचबाबत मत व्यक्त करत आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यन म्हणाले, "भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांसाठी संधींचा मोठा आणि सतत विस्तारणारा पट उपलब्ध आहे. वेगवेगळ्या बाजार भांडवल श्रेणी, क्षेत्रे आणि वाढीच्या टप्प्यांवरील कंपन्या त्यात आहेत. मात्र या व्याप्तीमुळे निर्णय घेणे अधिक गुंतागुंतीचेही होऊ शकते, कारण कोणती श्रेणी, कोणते क्षेत्र किंवा कोणती शैली सरस कामगिरी करेल हे अनेकदा ठरवावे लागते. बीएसई टोटल मार्केट इंडेक्सवर आधारित आमच्या योजना एका सोप्या विचारावर उभ्या आहेत. संपूर्ण केकमध्ये वाटा मिळवता येत असताना त्यातील एकच तुकडा निवडण्याचा अवघड निर्णय का घ्यायचा? आमच्या पॅसिव्ह योजनांमध्ये ही महत्त्वाची भर असल्याचे आम्ही मानतो. गुंतवणूक अधिक सोपी, व्यापक आणि सर्वांच्या आवाक्यातील करण्याच्या आमच्या मुलभूत विश्वासाचे प्रतिबिंब असलेली ही आमची फ्लॅगशिप योजना आहे."
फंडाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात हे स्पष्ट करताना आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे पॅसिव्ह गुंतवणूक विभागाचे प्रमुख हेमेन भाटिया म्हणाले, "लार्ज, मिड, स्मॉल आणि मायक्रो कॅप श्रेणींमध्ये पसरलेल्या भारताच्या एकूण बाजार भांडवलात पद्धतशीर प्रवेश देण्यासाठी
Comments
Post a Comment