शिवाजीनगर भागातील वाहतूक कोंडीचा, अतिक्रमणांचा प्रश्न तातडीने सोडवा: आप ची मागणी*



*शिवाजीनगर भागातील वाहतूक कोंडीचा, अतिक्रमणांचा प्रश्न तातडीने सोडवा: आप ची मागणी*

शिवाजीनगर भागात गणेश खिंड रोड, जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड , सेनापती बापट रोड , जुना मुंबई महामार्ग आदी महत्त्वाचे रस्ते असून या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील पदपथावरील अतिक्रमणे तातडीने दूर करावीत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने शिवाजीनगर सहाय्यक आयुक्त ढवळे यांची काल /३१ ऑगस्ट रोजी भेट घेऊन केली.

अनाधिकृतपणे वाढत चाललेल्या खाऊगल्ली आणि या भागातील वृक्षतोडीबाबतही अनेक तक्रारींचा पाढा मांडण्यात आला. गणेश खिंड रोड ची रुंदी विकास आराखड्याप्रमाणे मेट्रो ने विचारात न घेतल्यामुळे झालेल्या अडचणी तसेच वाकडेवाडी भुयारी मार्ग संदर्भातील चर्चा झाली. 

यावेळेस शिवाजीनगर भागातील आम आदमी पार्टी चे शंकर थोरात यांच्यासह मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे,संतोष काळे,शितल कांडेलकर,माधुरी गायकवाड, निरंजन अडागळे,राजेंद्र प्रसाद निसाद,श्रीकांत भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*