मलेशियातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीच्या ‘मर्डेका ११८ टॉवर‌’ पायऱ्या चढण्याच्या शर्यतीमध्ये पुण्याच्या अपर्णा उपाध्याय यांची दमदार कामगिरी !! एकमेव भारतीय खेळाडूने रचला इतिहास !!


मलेशियातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीच्या ‘मर्डेका ११८ टॉवर‌’ पायऱ्या चढण्याच्या शर्यतीमध्ये पुण्याच्या अपर्णा उपाध्याय यांची दमदार कामगिरी !! 
एकमेव भारतीय खेळाडूने रचला इतिहास !!

पुणे, दि. २ सप्टेंबरः मलेशियातील क्वालालंपूरमधील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या आणि ६७८.९ मीटर (२२२७ फुट) इतकी प्रचंडी उंची असलेल्या आणि ११८ मजल्यांवरील तब्बल २८४५ पायऱ्या चढून ‘मर्डेका ११८‌’ टॉवरमध्ये आयोजित ‘आयएचएच स्काय रेस‌’मध्ये पुण्याच्या ४३ वर्षीय अपर्णा उपाध्याय यांनी दमदार कामगिरी करत शर्यत पूर्ण (२२ ऑगस्ट रोजी) केली. या शर्यतीमध्ये त्यांनी ४८ मिनिटे ३६.३२७ सेकंदाची अधिकृत वेळ नोंदवली आणि या आव्हानात्मक शर्यतींमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली.

‘टॉवर रनिंग वर्ल्ड असोसिएशन‌’ (टिडब्ल्युए) अंतर्गत आंतरराष्ट्रीय ‘स्कायस्क्रेपर क्लाईंब‌’ (गगनचुंबी इमारतींच्या पायऱ्या चढण्याच्या शर्यती) तर्फे ‘व्हर्टीकल रनिंग‌’ म्हणजेच उंच इमारतींच्या पायऱ्या चढण्याच्या शर्यतींचे आयोजन करण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून अपर्णा उपाध्याय यांनी वेगवेगळ्या जगातिक ‘व्हर्टीकल रनिंग‌’ स्पर्धेत भाग घेतला आहे. अपर्णा यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी सिंगापूर येथील ३९ मजली आणि १२५६ पायऱ्या असलेला ‘फ्रेझर टॉवर‌’ सलग तिसऱ्यांदा सर केला. त्यानंतर दोनची दिवसांनी क्वालालंपूरमधील प्रतिष्ठित ‘मर्डेका ११८‌’ टॉवरमध्ये सहभागी होत सर्वोत्तम कामगिरी केली. त्यांनी अवघ्या ४८ तासांत दोन अत्यंत आव्हानात्मक यशस्वीपणे पूर्ण केल्या.

६७८.९ मीटर (२२२७ फुट) इतकी प्रचंडी उंची असलेली ‘मर्डेका ११८‌’ ही इमारत जगातील दुसऱ्या क्रमांची सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते. या शर्यतीसाठी शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी ११८ मजल्यांवरील तब्बल २८४५ पायऱ्या चढून अपर्णा यांनी आपल्या शारीरिक क्षमतेची अत्यंत कठीण अशी परिक्षा यशस्वीपणे पार पाडली. दुबईतील ‘बुर्ज खलिफा‌’ ही पहिल्या क्रमांकाची आणि ‘मर्डेका ११८‌’ पेक्षा अधिक उंच इमारत आहे.

अपर्णा यांचे सर्व शिक्षण मुंबईतील डोंबवली येथे झाले आणि २०२० मध्ये त्या पुण्याच्या नागरिक झाल्या. पुण्यातील हडपसर येथील ‘गेटवे टॉवर १००‌’ येथे त्या या शर्यतींसाठीचा सराव करत असे. उच्चशिक्षणासाठी त्या सिंगापुर येथे गेल्या आणि विविध इमारतींमध्ये होणाऱ्या ‘व्हर्टीकल रनिंग‌’ स्पर्धेत त्यांनी भाग घेण्यास सुरूवात केली. आपल्या या यशस्वी प्रयत्नाबद्दल बोलताना अपर्णा म्हणाल्या की, अशा स्पर्धांमध्ये अधिकाधिक महिलांनी सहभाग घेतला तर, महिलांमध्ये आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती होईल आणि त्यांना आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्याची क्षमता प्राप्त होईल. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत आणि न थांबता पुढे जाण्याचा निश्चय करते, तेव्हा कोणतीही इमारत खूप उंच वाटत नाही आणि कोणतेही ध्येय आवाक्याबाहेर राहत नाही. समाज कदाचित तुम्हाला सुरक्षित मार्ग निवडण्याचा सल्ला देईल, पण तुमची क्षमता तुम्हाला उंच भरारी घेण्यास प्रवृत्त करेल.

‘टॉवर रनिंग वर्ल्ड असोसिएशन‌’ (टिडब्ल्युए) अंतर्गत जगातील सर्वात उंच महाकाय इमारती सर करणाऱ्या एकमेव भारतीय महिला खेळाडू होण्याचा ऐतिहासिक मान त्यांनी पटकावला आहे. ‘टिडब्ल्युए‌’ ही पायऱ्या चढण्याच्या शर्यतींच्या (स्टेअर-क्लायंबिंग) प्रकारासाठी एकमेव जागतिक नियामक संस्था आहे. ती उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे नियमन करते आणि जागतिक दर्जाच्या ‘स्टेअर मॅरेथॉन्स्‌’ म्हणजेच पायऱ्या चढण्याच्या शर्यतींना अधिकृत मान्यता देते. या संस्थेमध्ये जगातील नोंदणीकृत एकूण १११ महिला असून अपर्णा यांचे ९८ वे मानांकन आहे.

अपर्णा यांच्या असाधारण ‘व्हर्टीकल रेसिंग‌’च्या कारकिर्दीत जगातील काही अत्यंत आव्हानात्मक शर्यतींचा समावेश होता. मर्डेका ११८ आणि फ्रेझर टॉवर यांच्यासह तैपेई १०१ रन-अप (२०२५) शर्यतीमध्ये तैवानमधील ५०८ मीटर उंच असलेल्या इमारतीवर ४८३६१४ःः मिनिटे या विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण केली. सिंगापूर लोकल चॅम्पियनशीप (जुलै २०२५) स्पर्धेत अवघ्या ७ मिनिटांमध्ये ३९ मजली टॉवर चढून आपली उत्कृष्ट स्पर्धात्मक गती सिध्द केली आणि दुसरे स्थान मिळवत पोडियम फिनिश केले.

मलेशियातील केएफ टॉवर (नोव्हेंबर २०२५) या ४२१ मीटर उंच दूरसंचार इमारतीवर यशस्वीपणे चढाई केली. चीनमधील शेन्झेन येथील जगातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वात उंच असणाऱ्या ‘पिंग आन इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर‌’ या टॉवर (जानेवारी २०२५) यशस्वीपणे सर केला. यामध्ये अपर्णा यांनी ५४७.६ मीटर उंचीपर्यंतचे ११६ मजले आणि ३२०१ पायऱ्या १ तास ०५ मिनिटे आणि ११ सेकंद यावेळेसह महिलांच्या श्रेणीत १७ वे स्थानही पटकावले होते. तसेच, अपर्णाने नोव्हेंबर २०२५ मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली 

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*