कोकणस्थ परिवार, पुणेच्या वतीने आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कुस्तीतील ज्येष्ठ प्रशिक्षक वस्ताद भगवान भोर यांचा खास सत्कार

कोकणस्थ परिवार, पुणेच्या वतीने आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कुस्तीतील ज्येष्ठ प्रशिक्षक वस्ताद भगवान भोर यांचा खास सत्कार संस्थेचे क्रीडा समिती अध्यक्ष राजेंद्र आवारे यांच्या हस्ते पंडित नेहरू स्टेडियम, पुणे येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर होते. 

     चंद्रकांत खराटे यांनी स्वागत केले. श्रीनाथ हगवणे यांनी प्रस्ताविक केले. अमोल करचे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राजू सोळंके यांनी सूत्रसंचालन केले. 

     भगवान भोर हे गेली 40-45 वर्ष महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड, पुणे येथे कुस्तीचे प्रशिक्षण देत आहेत. अनेक नामवंत मल्लांचे प्रशिक्षक असलेले भगवान भोर हे अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय येथे सर्बिसला होते. 

     शिक्षक दिनी करण्यात आलेला माझा हा सत्कार माझे कुस्ती क्षेत्रातील मनोबल अधिक वाढवेल असे प्रतिपादन भोर यांनी या वेळी केले. 

    संदीप जाधव, ऋषिकेश राजमाने, संकेत शर्मा, राहुल नाईकनवरे आणि मयुर बाठीया आदींनी कार्यक्रमाचे यशस्वी साठी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*