पराग मिल्क फूड्सची पनीर उत्पादन क्षमता 4 पटीने वाढवून दररोज 80 MT करण्याची योजना
पराग मिल्क फूड्सची पनीर उत्पादन क्षमता 4 पटीने वाढवून दररोज 80 MT करण्याची योजना
नवीन दररोज 60 MT क्षमतेची सुविधा उभारण्यासाठी 100 कोटी रु. गुंतवणुकीची योजना; यामुळे पनीरची एकूण उत्पादन क्षमता सध्याच्या रोजच्या 20 MT वरून रोज 80 MT होणार; संपूर्ण भारतभर वितरणाच्या माध्यमातून कंपनीच्या प्रमुख श्रेणीला अधिक बळकटी मिळणार
मुंबई, 22 सप्टेंबर 2026: भारतातील आघाडीच्या डेअरी आणि पोषण कंपन्यांपैकी एक असलेल्या पराग मिल्क फूड्स लिमिटेडने मंचर (महाराष्ट्र) आणि पलमनेर (आंध्र प्रदेश) येथे पनीरच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासाठी अंदाजे 100 कोटी रु. गुंतवणूक करून ती सध्याच्या रोजच्या दिवसाला 20 MT वरून रोज 80 MT करण्याची योजना आखली आहे. विस्तारित सुविधा केंद्रांमध्ये नियमित तसेच उच्च प्रथिनयुक्त पनीरचे उत्पादन केले जाईल आणि ही सुविधा केंद्रे जून 2027पर्यंत कार्यान्वित होमूल्यवर्धित उत्पादने कंपनीच्या एकूण उलाढालीत 90% पेक्षा अधिक योगदान देतात आणि पनीर ही कंपनीची प्रमुख उत्पादन श्रेणी असून, गेल्या दोन वर्षांत तिची वार्षिक 28% दराने वाढ झाली आहे. ताज्या पनीरच्या क्षेत्रातील परागच्या तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्णतेच्या प्रयत्नांना ही गुंतवणूक पुढे घेऊन जाणार आहे. प्रगत उत्पादन आणि पॅकेजिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपनीच्या ब्रँडेड पनीरला कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता 75 दिवसांपर्यंत पनीरची गुणवत्ता कायम राखण्याची क्षमता मिळते.
भारतीय डेअरी क्षेत्रातील पनीर ही सर्वात मोठ्या उत्पादन श्रेणींपैकी एक आहे. ग्राहकांकडून अधिक उच्च आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेची मागणी वाढत असल्याने या श्रेणीतील मागणी असंघटित क्षेत्राकडून संघटित कंपन्यांकडे वळत आहे. सध्या या श्रेणीतील केवळ सुमारे 5-6% हिस्सा संघटित कंपन्यांकडे आहे. या बदलत्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी पराग आपली उत्पादन क्षमता चौपट करत आहे. यामुळे कंपनीला आपल्या नियमित तसेच उच्च प्रथिनयुक्त पनीरच्या उत्पादन श्रेणींचा देशभरातील विस्तार अधिक मजबूत करता येणार आहे.
पराग आपल्या उत्पादन क्षमतांचा आणि देशभरातील वितरण नेटवर्कचा वापर करून जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, क्विक कॉमर्स, ई-कॉमर्स आणि HoReCa या सर्व माध्यमांमध्ये पनीर अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देणार आहे. उत्पादन क्षमतेतील वाढ आणि पॅकेजिंगमधील नाविन्यपूर्णता यांच्या एकत्रीकरणामुळे विविध वितरण माध्यमांद्वारे आणि अधिक लांबच्या अंतरापर्यंत ब्रँडेड पनीर वितरित करणे शक्य होईल तसेच ग्राहकांच्या अपेक्षेनुसार त्याचा ताजेपणा आणि गुणवत्ता कायम राखता येईल.
ही गुंतवणूक उच्च-वाढीच्या मूल्यवर्धित उत्पादन श्रेणींमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभारणे, कंपनीच्या प्रमुख ब्रँड्सना अधिक बळकटी देणे आणि नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून वेगळी ओळख असलेली उत्पादने विकसित करणे या परागच्या धोरणाचा भाग आहे. तसेच, ब्रँडेड, पॅकेज्ड आणि प्रमाणित उत्पादनांना ग्राहकांकडून वाढत असलेल्या पसंतीलाही हा विस्तार प्रतिसाद देतो.
पराग मिल्क फूड्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) राहुल कुमार श्रीवास्तव म्हणाले:
“पनीर हा भारतीय ग्राहकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. दीर्घ कालावधीपर्यंत पनीरचा ताजेपणा आणि गुणवत्ता कायम राखण्याची उत्पादनविषयक क्षमता आमच्याकडे आहे. आमची पनीर उत्पादन क्षमता दिवसाला 60 MT ने वाढवून एकूण क्षमता दिवसाला 20 MT वरून 80 MT करण्याची योजना जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. या क्षमतेच्या विस्तारामुळे आम्हाला देशभरातील वितरणाचा विस्तार करता येईल आणि विविध वितरण माध्यमांमध्ये आमचे पनीर उपलब्ध करून देता येईल. नाविन्यपूर्णता, उत्पादन क्षमता आणि ग्राहकांपर्यंत व्यापक पोहोच यांच्या माध्यमातून मूल्यवर्धित डेअरी उत्पादनांमधील आमचे स्थान अधिक मजबूत करण्याची मोठी संधी आम्हाला दिसत आहे.”
IMARC च्या अहवालानुसार, 2025 मध्ये भारतीय पनीर बाजारपेठेचे मूल्य 73,140 कोटी रु. होते आणि 2034 पर्यंत ते 2.15 लाख कोटी रु. पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2026 ते 2034 दरम्यान 12.34% च्या CAGRने या बाजारपेठेची वाढ होण्याचा अंदाज आहे. प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांची वाढती मागणी, ब्रँडेड आणि पॅकेज्ड डेअरी उत्पादनांना वाढती पसंती, संघटित रिटेल विक्री तसेच ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स माध्यमांचा विस्तार यामुळे ही वाढ होत आहे.Top of Form
Comments
Post a Comment