पुणे मशीन टूल एक्स्पो 2026 आणि फॅक्टेक (FACTEQ) 2026 चे पुण्यात उद्घाटन; आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि उद्योगातील नव्या संधींचे प्रदर्शन

पुणे मशीन टूल एक्स्पो 2026 आणि फॅक्टेक (FACTEQ) 2026 चे पुण्यात उद्घाटन; आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि उद्योगातील नव्या संधींचे प्रदर्शन
11 हजार चौरस मीटरच्या प्रदर्शनात 175 हून अधिक कंपन्या, 300 व्यावसायिक प्रतिनिधी आणि 18 हजारांहून अधिक अभ्यागत एकत्र येणार
पुणे, भारत, 7 सप्टेंबर 2026: इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) यांच्या वतीने आयोजित पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) 2026 आणि त्यासोबत आयोजित फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) 2026 चे आज पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC), मोशी, पुणे येथे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपेंद्र सिंह कुशवाह, आयएएस, महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विकास आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आयएएस, टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री. अरविंद गोयल आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. नलिनीकांत गोल्लागुंटा यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाला आयएमटीएमएच्या अध्यक्षा सुश्री मोहिनी केळकर, आयएमटीएमएचे उपाध्यक्ष श्री. विक्रम साळुंके आणि आयएमटीएमएचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (DG & CEO) श्री. जिबाक दासगुप्ता हे उपस्थित होते.
पुण्यात हे प्रदर्शन आयोजित करण्याच्या आयएमटीएमएच्या निर्णयाबाबत बोलताना श्रीमती मोहिनी केळकर म्हणाल्या, “महाराष्ट्रात भारतातील सर्वात मजबूत मशीन टूल उद्योग व्यवस्था आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर येथे महत्त्वाचे औद्योगिक समूह आहेत. पुणे हे ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग कंपन्यांचे प्रमुख केंद्र असल्याने येथे उच्च अचूकतेच्या उत्पादन तंत्रज्ञानाची मोठी गरज आहे. ही गरज मशीन टूल उद्योग पूर्ण करतो. महाराष्ट्रात आयएमटीएमएची मजबूत उपस्थिती असून, संस्थेचे सुमारे 180 सदस्य आहेत. गेल्या दोन दशकांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयएमटीएमए उद्योगांना सातत्याने सहकार्य करत आहे.”
श्रीमती केळकर यांच्या मतांशी सहमती दर्शवत आयएमटीएमएचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिबाक दासगुप्ता म्हणाले, “पुणे हे विविध उत्पादन उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या भागातील उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी आयएमटीएमए कडून पीएमटीएक्स आणि फॅक्टेक (FACTEQ) प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक आवृत्तीसोबत या प्रदर्शनांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. मशीन टूल्सचे उत्पादक आणि त्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांकडूनही या प्रदर्शनांना मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.”
अधिक माहितीसाठी www.mtx.co.in आणि www.facteq.in या संकेतस्थळांना भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*