सॅमसंगकडून Galaxy Forever लाँच: तरुण ग्राहकांसाठी गॅलेक्सी झेड फोल्ड८ सिरीज खरेदी
सॅमसंगकडून Galaxy Forever लाँच: तरुण ग्राहकांसाठी गॅलेक्सी झेड फोल्ड८ सिरीज खरेदी करण्याचा आणि आनंद घेण्याचा स्थिर मार्ग
• २४ महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय आणि सॅमसंग केअर+ प्रोटेक्शन सर्वोत्कृष्ट फोल्डेबल अनुभवाचा आनंद घेताना अधिक मनःशांती प्रदान करते.
• १० व्या महिन्यापासून ५५ टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड बायबॅक ग्राहकांना अपग्रेड करताना अधिक मूल्य आणि स्थिरता प्रदान करते.
गुरुग्राम, भारत - ऑगस्ट १८, २०२६ - सॅमसंग इंडियाने गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८ स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी स्थिर मालकी उपक्रम Galaxy Forever लाँच केला आहे. हा उपक्रम २४ महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय, सॅमसंग केअर+ डिवाईस प्रोटेक्शन आणि डिवाईसच्या इनव्हॉइस मूल्याच्या ५५ टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य देतो.
Galaxy Forever तरुण ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जे आज प्रीमियम फोल्डेबल फोन असण्याची इच्छा ठेवतात, पण ते अपग्रेड करण्यासाठी तयार असतात तेव्हा त्याच्या मूल्याबद्दल अधिक खात्री इच्छितात. प्रचलित रीसेल किमतींवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी, ग्राहकांकडे या उपक्रमाच्या अटींच्या अधीन राहून आपले डिवाईस अपग्रेड करण्याचा किंवा परत करण्याचा निश्चित मार्ग उपलब्ध आहे.
Galaxy Forever तीन मुख्य फायदे एकत्र आणतो:
1. २४ महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय, जे प्रीमियम फोल्डेबल तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य बनवते.
2. सॅमसंग केअर+ डिवाईस प्रोटेक्शन, जे ग्राहकांना अधिक मनःशांती देण्यासाठी झिरो क्लेम प्रोसेसिंग फी सह नकळतपणे खाली पडल्यामुळे आणि द्रवपदार्थामुळे होणाऱ्या नुकसानासाठी (लिक्विड डॅमेज) संरक्षण प्रदान करते (ग्राहकांना सॅमसंग केअर+ वेगळे खरेदी करण्याची आवश्यकता नाही, कारण ते या उपक्रमात समाविष्ट आहे).
3. ५५ टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य, जे ग्राहकांना उपक्रमाच्या अटींच्या अधीन राहून १०व्या महिन्यापासून त्यांचे डिवाईस अपग्रेड करण्याची किंवा परत करण्याची सुविधा देते.
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा Galaxy Forever च्या माध्यमातून प्रति महिना ९४१७ रुपये ईएमआयसह उपलब्ध आहे, तर गॅलेक्सी झेड फोल्ड८ च्या ईएमआयची सुरूवात प्रति महिना ८५८४ रुपये या दराने होते. दोन्ही प्लॅन्स २४ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर आधारित आहेत आणि त्यामध्ये Galaxy Forever उपक्रम शुल्काचा समावेश आहे.
अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य ग्राहक कधी डिवाईस अपग्रेड किंवा परत करणे निवडतात, यावर अवलंबून असते:
• १० वा–११ वा महिना: डिवाईसच्या इनव्हॉइस मूल्याच्या ५५ टक्के
• १२ वा–१३ वा महिना: ५० टक्के
• १४ वा–१८ वा महिना: ४५ टक्के
• १९ वा–२५ वा महिना: ४० टक्के
हे ग्राहकांना त्यांच्या पुढील अपग्रेडचे नियोजन करताना अधिक स्पष्टता प्रदान करते. Galaxy Forever ग्राहकांना त्यांचे डिवाईस कसे वापरावे याविषयी स्थिरता देखील देते. ज्या ग्राहकांना अपग्रेड करायचे आहे ते या उपक्रमाद्वारे पुढील गॅलेक्सी प्रमुख डिवाईसेस खरेदी करू शकतात. ज्यांना त्यांचे सध्याचे डिवाईस वापरणे सुरू ठेवायचे आहे ते उपक्रमाच्या लागू अटींच्या अधीन राहून त्यांचे डिवाईस वापरणे सुरू ठेवू शकतात.
हा उपक्रम पारंपारिक स्मार्टफोन मालकीची जागा घेण्याऐवजी त्याला पूरक ठरेल अशा पद्धतीने डिझाइन केला गेला आहे. ग्राहक त्यांचे स्मार्टफोन पूर्णपणे खरेदी करणे आणि त्यांची मालकी ठेवणे सुरू ठेवू शकतात. Galaxy Forever अशा ग्राहकांसाठी एक पर्याय प्रदान करतो, जे अंदाज लावण्यायोग्य अपग्रेड पर्याय, डिवाईस प्रोटेक्शन आणि दीर्घकालीन मालकीच्या खर्चाला अधिक महत्त्व देतात. Galaxy Forever सह सॅमसंग फायनान्सिंग, प्रोटेक्शन आणि अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य एकाच मालकीच्या प्रस्तावात एकत्र आणते. हे ग्राहकांना आजच नवीन गॅलेक्सी फोल्डेबल तंत्रज्ञान उपलब्ध करून देते, तसेच ते अपग्रेड करण्याचा निर्णय घेतात तेव्हा अधिक स्पष्ट मार्ग प्रदान करते.
Galaxy Forever ची प्रमुख वैशिष्ट्ये
• Galaxy Foreve सह गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा: प्रति महिना ९४१७ रुपये, ज्यामध्ये ८३३४ रुपये डिवाईस ईएमआय + १०८३ रुपये Galaxy Forever उपक्रम शुल्काचा समावेश आहे.
• Galaxy Forever सह गॅलेक्सी झेड फोल्ड८: प्रति महिना ८५८४ रुपये, ज्यामध्ये ७५०० रुपये डिवाईस ईएमआय + १०८४ रुपये Galaxy Forever उपक्रम शुल्काचा समावेश आहे.
• २४ महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय.
• ५५ टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य*
• उपक्रमाच्या अटींच्या अधीन राहून १० व्या महिन्यापासून बायबॅक उपलब्ध.
• झिरो क्लेम प्रोसेसिंग फी सह सॅमसंग केअर+ डिवाईस प्रोटेक्शन.
Comments
Post a Comment