आशियातील सर्वाधिक उंचीवरील मोटरसायकल प्रशिक्षण केंद्र म्हणून CEAT एंड्युरो पार्क लडाखने भारताला जागतिक एंड्युरो नकाशावर मिळवून दिले स्थान


आशियातील सर्वाधिक उंचीवरील मोटरसायकल प्रशिक्षण केंद्र म्हणून CEAT एंड्युरो पार्क लडाखने भारताला जागतिक एंड्युरो नकाशावर मिळवून दिले स्थान


भारत बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मान्यता
लेहमध्ये 3,500 मीटर उंचीवर असलेल्या या खास उभारलेल्या ऑफ-रोड प्रशिक्षण केंद्रात ऑगस्ट 2024 मध्ये सुरुवात झाल्यापासून 2,500 हून अधिक रायडर्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे
ही मान्यता म्हणजे लडाखमध्ये ऑफ-रोड रायडर प्रशिक्षण आणि स्थानिक कौशल्य विकासासाठी सुसूत्र परिसंस्था उभारण्याच्या CEATच्या प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा आहे
 

लेह, 19 ऑगस्ट 2026: CEAT लडाख एंड्युरो पार्कला आशियातील सर्वाधिक उंचीवरील मोटरसायकल प्रशिक्षण केंद्र म्हणून भारत बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मान्यता मिळाली असल्याचे CEAT लिमिटेडतर्फे आज जाहीर करण्यात आले.

लेहमध्ये समुद्रसपाटीपासून अंदाजे 3,500 मीटर उंचीवर असलेल्या या कायमस्वरूपी आणि खास उभारलेल्या ऑफ-रोड प्रशिक्षण केंद्रात 7 ऑगस्ट 2024 रोजी सुरुवात झाल्यापासून 2,500 हून अधिक रायडर्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लडाखच्या आव्हानात्मक अतिउंच प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या या पार्कमध्ये नैसर्गिकरीत्या आव्हानात्मक रायडिंग परिस्थिती, व्यावसायिक पद्धतीने डिझाइन केलेला ट्रॅक आणि खास तयार करण्यात आलेले अडथळे यांचा समावेश आहे. त्यामुळे रायडर्सना ऑफ-रोड रायडिंगचे तंत्र, आत्मविश्वास आणि वाहनावरील नियंत्रण विकसित करण्यासाठी एक वेगळे वातावरण मिळते.

 

ही मान्यता मिळाल्यामुळे आज पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात CEATचे वरिष्ठ नेतृत्व, साहसी रायडर्स आणि लडाखमधील मोटरसायकल समुदायाचे सदस्य उपस्थित होते.

 

CEAT लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी लक्ष्मी नारायणन बी. म्हणाले, “भारत बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून CEAT लडाख एंड्युरो पार्कला मिळालेली मान्यता आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही जेव्हा हे पार्क उभारले, तेव्हा केवळ एक ऑफ-रोड ट्रॅक तयार करण्याची आमची महत्त्वाकांक्षा नव्हती - तर रायडर्सना शिकता यावे, त्यांचे कौशल्य विकसित करता यावे आणि जगातील काही सर्वाधिक आव्हानात्मक मोटरसायकलिंग भूभागाचा सुव्यवस्थित वातावरणात अनुभव घेता यावा असे एक विश्वासार्ह व्यासपीठ उभारण्याचे आमचे उद्दिष्ट होते. दोन वर्षांत 2,500 हून अधिक रायडर्सना प्रशिक्षण दिल्याने, भारतात कुशल आणि जबाबदार साहसी रायडिंगची अधिक मजबूत संस्कृती निर्माण करण्याची क्षमता या पार्क मध्ये असल्याचेही सूचित होत आहे.”

 

भारताच्या वाढत्या ऑफ-रोड रायडिंग समुदायासाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून संकल्पित करण्यात आलेल्या लडाख एंड्युरो पार्कची रचना केवळ मनोरंजनासाठीच्या ट्रॅकपुरती मर्यादित न राहता, रायडर्सना टप्प्याटप्प्याने कौशल्य विकसित करण्याचा अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. या केंद्रातील तीन स्तरांच्या संरचित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध कौशल्य पातळीवरील रायडर्सचा समावेश केला जातो. या प्रशिक्षणात भूभागानुसार मार्गक्रमण, शरीराची स्थिती, मोटरसायकलवरील नियंत्रण आणि अडथळ्यांचे व्यवस्थापन यावर भर दिला जातो.

 

मनोरंजनात्मक आणि प्रगत रायडर प्रशिक्षणापलीकडे लडाखमधील स्थानिक मोटरसायकलिंग परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठीही CEAT या सुविधेचा वापर करत आहे. लडाख बाइक रेंटल को-ऑपरेटिव्ह असोसिएशनच्या भागीदारीत कंपनी एक विशेष मार्शल प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. या कार्यक्रमाचा उद्देश लडाखच्या आव्हानात्मक अतिउंच प्रदेशातील परिस्थितीत रायडर्सना सुरक्षितपणे मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्यक्ष कौशल्ये विकसित करणे हा आहे.

 

या प्रशिक्षण कार्यक्रमात ऑफ-रोड रायडिंगच्या तीन स्तरांसह प्रथमोपचार आणि CPR, आपत्कालीन परिस्थिती आणि अपघातांना प्रतिसाद देणे, वळण आणि धोका यासाठी हातांच्या खुणांचा वापर, विविध प्रकारच्या भूभागानुसार मोटरसायकलची तयारी, तसेच ग्राहकांशी व्यवहार आणि संवाद यांचा समावेश आहे. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर सहभागींना प्रमाणपत्र दिले जाते.



या उपक्रमाचा उद्देश स्थानिक तरुण रायडर्स आणि मार्शल्सना अनुभवी व्यावसायिकांकडून शिकण्याच्या आणि व्यावसायिक मार्शलिंग तसेच स्पर्धात्मक रायडिंगमध्ये करिअरच्या संधी विकसित करण्याच्या संधी निर्माण करणे हाही आहे. त्यामुळे या पार्कला समुदाय विकास आणि जीवनमान विकासाचीही एक महत्त्वाची जोड मिळते.

 

व्यावसायिक पद्धतीने डिझाइन केलेली प्रशिक्षण पायाभूत सुविधा, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील प्रशिक्षण आणि लडाखचा नैसर्गिक भूभाग हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत, CEAT लडाख एंड्युरो पार्क भारतातील ऑफ-रोड रायडर विकासासाठी एक नवा मापदंड स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर, देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित मोटरसायकलिंग स्थळांपैकी

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*