स्वरूप वाघमारे यांना महर्षि वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार प्रदान
स्वरूप वाघमारे यांना महर्षि वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार प्रदान
पुणे : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, समर्पित आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी येथील समाजशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका स्वरूप ए. वाघमारे यांना नुकताच ‘महर्षि वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार २०२६-२७’ प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त १६ ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्कारासाठी देशभरातून १७८ नामांकने प्राप्त झाली होती. त्यापैकी शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाच्या आधारे ७५ मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये स्वरूप वाघमारे यांचा समावेश आहे.
या पुरस्कार सोहळ्यास डॉ. कविता साळुंके, श्री. विशाल गावीत, डॉ. चुतर पी. सावंत, श्री. गोरख देवरे, डॉ. राकेश अशोक रामराजे आणि श्री. सारांश शेड भावसार हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
ज्ञानाचा प्रसार, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाची दखल घेत स्वरूप वाघमारे यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना स्वरूप वाघमारे म्हणाल्या, “हा सन्मान माझे पहिले गुरु असलेले माझे वडील श्री. अशोक वाघमारे, माझे शिक्षक व मार्गदर्शक, माझे विद्यार्थी, सहकारी आणि माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक कठीण व यशस्वी क्षणी मला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समर्पित आहे. हा पुरस्कार मी अत्यंत नम्रपणे स्वीकारते.”
स्वरूप वाघमारे यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य पुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment