अरण्येश्वर एकता मित्र मंडळामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन विशेष रांगोळी स्पर्धा संपन्न...रांगोळीच्या माध्यमातून देशाचा मान वाढवूयाचा दिला नारा...!



*अरण्येश्वर एकता मित्र मंडळामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन विशेष रांगोळी स्पर्धा संपन्न...रांगोळीच्या माध्यमातून देशाचा मान वाढवूयाचा दिला नारा...!*

शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी अरण्येश्वर एकता मित्र मंडळामध्ये सकाळी ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर रंगांमधून देशभक्ती व्यक्त करण्यासाठी मंडळातील लहान बाळ युवा विद्यार्थ्यांसाठी ' विशेष रांगोळी स्पर्धा' आयोजित करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांच्या सुप्त कलागुनांना वाव देण्यासाठी या आकर्षक 'रांगोळी स्पर्धेचे' आयोजन करण्याचा हेतू यशस्वी झाला.

यात मुलांनी तिरंगा, अशोक चक्र व भारताच्या वेगवेगळ्या देशभक्तीपर प्रतिमा रांगोळीतून साकारल्या. ही स्पर्धा कला आणि सर्जनशीलतेचा एक सुंदर सोहळा होता. या स्पर्धेचे आयोजन अंगणवाडी सेविका शैलाताई मारणे व मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मांढरे यांच्या माध्यमातून करण्यात आले. या स्पर्धेसाठी मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले कार्यकर्ते चैतन्य ढमाले, संकेत आढाव यांचे सहकार्य लाभले. मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अविनाश खंडागळे व अनिल ढमाले यांच्या हस्ते बक्षीस वितरण सभारंभ संपन्न झाला.

-

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*