सेमीकंडक्टर आणि व्हीएलएसआय डिझाईन - औद्योगिक भविष्याची रचना घडवणारे क्षेत्र


सेमीकंडक्टर आणि व्हीएलएसआय डिझाईन - औद्योगिक भविष्याची रचना घडवणारे क्षेत्र

 आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या प्रगतीमागे सेमीकंडक्टर चिपची महत्त्वाची भूमिका आहे.कृत्रिम बुध्दिमत्ता,इलेक्ट्रिक वाहने,इंटरनेट ऑफ थिंग्स,5जी,6जी,रोबोटिक्स,स्मार्ट हेल्थकेअर आणि हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग यांसारख्या क्षेत्रांसाठी प्रगत सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आवश्यक आहे.त्यामुळे सेमीकंडक्टर आणि व्हीएलएसआय डिझाईन हे आता केवळ एक विशिष्ट क्षेत्र राहिले नसून भविष्यातील अभियांत्रिकीमधील महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे.

भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे.2023 मध्ये सेमीकंडक्टर बाजारपेठेचे मूल्य हे 38 अब्ज डॉलर इतके होते,तर 2030 पर्यंत 100 ते 110 अब्ज डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.त्याशिवाय जगभरातील जवळपास 20 टक्के चिप डिझाईन अभियंते भारतात कार्यरत असल्याचा अंदाज आहे.जगभरात सेमीकंडक्टर क्षेत्रात डिझाईन पासून ते पुरवठासाखळीपर्यंत वर्चस्व मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे.यातूनच याचे महत्त्व दिसून येते.

या सर्व गोष्टी लक्षात घेता विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरचा एक महत्त्वपूर्ण पर्याय हे क्षेत्र ठरेल यात शंका नाही.पण या क्षेत्रात काही विशिष्ट कौशल्याची गरज असते.आणि हीच कौशल्ये पुढील प्रवासाचा भक्कम पाया ठरतील. ॲनालॉग ॲन्ड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर फिजिक्स,सिग्नल प्रोसेसिंग,डिजिटल सिस्टिम्स डिझाईन ,सिस्टिम ऑप्टिमायझेशन,व्हेरीलॉग,व्हीएचडीएल हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेजेस यांबाबत सखोल अभ्यास करावा लागतो.चिप डिझाईनसाठी हा एक भक्कम पाया आहे.केवळ सैध्दांतिक ज्ञान पुरेसे नसून प्रत्यक्ष अनभुवही तितकाच महत्त्वाचा आहे.फील्ड प्रोग्रॅमेबल गेट आरे (रीप्रोग्रॅमेबेल सेमीकंडक्टर चिपवर कस्टमेबल डिजिटल हार्डवेअर सर्किट संदर्भात डिझाईन,कोडींग व टेस्टींग),सर्किट सिम्युलेशनसह प्रोसेसरचे मुलभूत डिझाईन,प्रोटोटाईप करणे,समस्या सोडवणे आणि प्रयोगातून शिकणे विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवतात.त्याचबरोबर संवाद कौशल्य,सांघिक कार्य,दस्ताऐवजीकरण आणि शिस्तबध्द समस्या निराकरण याचेही तितकेच महत्त्व आहे.

हे सर्व लक्षात घेता यासंदर्भात अनेक कोर्सेस हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा.इंटेलिजंट सिस्टिम्स,कनेक्टेड डिव्हाईसेस,ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग याद्वारे औद्योगिक क्षेत्राची पुनर्रचना होत असताना सेमीकंडक्टर क्षेत्रातील अभियंते या प्रगतीमध्ये केंद्रस्थानी असणार आहेत.भविष्याची रचना ही चिपच्या पातळीवर केली जाणार आहे.त्यामुळे हे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे.
 
 डॉ.मिलिंद पांडे
प्र-कुलगुरू
एमआयटी डब्ल्यूपीयू
---

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*