अभिनवमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजराकोणताही प्रश्न सत्ताधाऱ्याला विचारणे हे आपले मूलभूत स्वातंत्र्य - राजीव जगताप
अभिनवमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कोणताही प्रश्न सत्ताधाऱ्याला विचारणे हे आपले मूलभूत स्वातंत्र्य
- राजीव जगताप
आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे आपले मूलभूत स्वातंत्र्य आहे आणि ते सर्वांनी जपले पाहिजे असे प्रतिपादन संस्थापक राजीव जगताप यांनी केले.
आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन समारंभात केले ,यावेळी प्रमुख पाहुणे ओमकार वाबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी संस्थापक राजीव जगताप, उपाध्यक्ष संजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप, सह सेक्रेटरी निर्मोही जगताप दीपिका जगताप ॲड.दिलीप जगताप,समन्वयक डॉ. सविता शिंदे,प्राचार्या वर्षा शर्मा,मुख्याध्यापिका मनीषा शिंदे,संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य,पर्यवेक्षिका,शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यानंतर देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पूर्व प्राथमिकच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभकीपर गाण्यावर नृत्य करून उपस्थित सर्वांची वाहवा मिळवली. परिणीता काटे, अद्विका पठारे,प्रणित खांबे, साक्षी गायकवाड,यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विचार व्यक्त केले. यानंतर संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.पाहुण्यांची ओळख आणि प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी केले. गौरी व्यवहारे, अवनिश कश्यप, रेवंतकुमार या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले,तर आभार आरन बिनो या एन एस एस स्वयंसेवकाने मानले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment