पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस साजरा.
*पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस साजरा.*
पुणे :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी काँग्रेस भवन येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला व त्यानंतर केक कापून लहान मुलांना त्याचे वाटप करण्यात आले. तसेच निवारा वृध्दाश्रम येथे अन्नदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य व पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष *द. स. पोळेकर* व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाचे खजिनदार *चंद्रशेखर कपोते* यांनी केले.
Comments
Post a Comment