परंपरेचा सन्मान आणि कार्यकर्त्यांची भावना; विसर्जन मिरवणुकीतील निर्बंधांबाबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांशी भेट!

परंपरेचा सन्मान आणि कार्यकर्त्यांची भावना; विसर्जन मिरवणुकीतील निर्बंधांबाबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांशी भेट!

पुण्यातील ऐतिहासिक व वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आज युवासेनेच्या वतीने पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी विसर्जन मिरवणुकीतील स्पीकर वापराबाबत पोलीस प्रशासनाने लादलेले कठोर निर्बंध मागे घेण्यात यावेत, या मागणीचे निवेदन सुपूर्द केले.

तब्बल २४ ते ३० तास अविरत चालणारी अनंतात विसर्जन मिरवणूक ही पुण्याची जागतिक स्तरावरील सांस्कृतिक ओळख आहे. हा महासोहळा सुरक्षित व शिस्तबद्ध पार पाडण्यात पुणे पोलीस दलाचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिलेले आहे. मात्र, यंदा प्रशासनाने गणेश मंडळांना व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिक्षेपकांवर (स्पीकर) एकतर्फी निर्बंध लादले आहेत. पुण्यातील गणेशोत्सव हा लोकवर्गणीतून आणि हजारो कार्यकर्त्यांच्या भावनेतून उभा राहतो. अनेक मंडळांनी मिरवणुकीसाठी आधीच स्पीकर यंत्रणांचे बुकिंग केलेले असल्याने या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

माझी पोलीस प्रशासनाला हीच नम्र विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा. सर्व प्रमुख गणेश मंडळांचे प्रतिनिधी, अध्यक्ष व कार्यकर्त्यांशी तात्काळ संयुक्त बैठक घेऊन समन्वय साधावा आणि हे निर्बंध शिथिल करून सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव परंपरेनुसार उत्साहात साजरा करू द्यावा.

या प्रसंगी उपस्थित युवासेना पदाधिकारी व सहकारी:
अविनाश खेडेकर, ओमकार आढाव, अनिराज कुऱ्हाडे, विशाल लोखंडे, विशाल सरोदे, अक्षय फुलसुंदर, कार्तिक परदेशी, विशाल सूर्यवंशी, मंगेश चव्हाण, देवेंद्र सुतार, सिद्धेश कामठे, अतुल शेलार, आबा लोखंडे यांच्यासह युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*