चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत वरदन कोलतेचा सनसनाटी विजय



चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत वरदन कोलतेचा सनसनाटी विजय 

पुणे, 26 ऑगस्ट 2026: सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित वरदन कोलतेने दुसऱ्या मानांकित शारंग गवळीचा 11-7,7-11,11-7,11-7 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. 

प्रभात रोड येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर येथील टेबल टेनिस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात उप उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित अद्वैय हुद्दर याने पुष्कर चक्रदेवचा 12-10,11-6,12-10 असा सहज पराभव केला. सहाव्या मानांकित स्वरूप भाडळकर याने रयान लेलेचा 11-3,11-7,12-10 असा तर, पाचव्या मानांकित निशाद लेले याने विहान घाटकरचा 11-7,11-9,11-7 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 
  
15 वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित दिया शिंदे हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत विदिता घाटकरवर 11-8,11-9,11-6 असा विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनने अन्विता देशपांडेला 11-9,9-11,11-1,11-7 असे नमविले. सहाव्या मानांकित आहाना गोडबोलेने स्पृहा बोरगावकर वर 11-3,11-8,11-3 असा विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहन उसगावकर, सिम्बॉयसिसच्या वित्तीय विभागाचे सुनील जैन, मुख्य पंच मधुकर लोणारे आदी उपस्थित होते. 

निकाल: 15 वर्षांखालील मुली: उप-उपांत्यपूर्व फेरी: 
दिया शिंदे[1]वि.वि.विदिता घाटकर 11-8,11-9,11-6; 
डायना पटेल वि.वि.सान्वी नवांगुल 5-11,11-4,12-10,11-8;
स्पृहा गुजर[5] वि.वि.शरण्या प्रधान 6-11,11-6,11-6,11-8;
अनन्या पाटील[4] वि.वि.शगुन गणेशी 11-5,5-11,11-9,12-10;
शरण्या पटवर्धन[3] वि.वि.अन्विता देशपांडे 11-9,9-11,11-1,11-7; 
आहाना गोडबोले[6] वि.वि.स्पृहा बोरगावकर 11-3,11-8,11-3;
श्रेया कोठारी वि.वि.श्रीनिका उमेकर 11-7,8-11,11-9,8-11,15-13;
नीरजा देशमुख[2] वि.वि.सारा गांधी 11-8,11-9,11-7;
 
15 वर्षांखालील मुले: दुसरी फेरी:
आर्यन वानखेडे[१] वि.वि.अंगदसिंग उप्पल 11-5,11-8,11-4;
साहिल भोरकर वि.वि.श्लोक प्रधान 11-4,11-2,11-4;
अंगद भार्गवे वि.वि.विहान घाटकर 12-10,11-9,11-9;
एल्विस टॉम[8] वि.वि.पृथ्वी करडे 11-2,11-4,11-4;
वरदान कोलते[5] वि.वि.वरदन पवार 11-9,11-7,7-11,11-7;
साद वकील वि.वि.अद्विक शिंदे 11-6,11-9,11-7;
मिथिल ठक्कर वि.वि.आरव अपूर्व 11-6,11-4,11-8;
नभ पांचोलिया[4] वि.वि.क्षितिज अवधानी 11-7,11-5,11-3; 
ऋग्वेद दांडेकर[3] वि.वि.आरव गंधे 11-6,11-5,11-9;

17 वर्षांखालील मुली: उप-उपांत्यपूर्व फेरी: 
दिया शिंदे[1] वि.वि.लीशा महाजन 12-10,11-5,11-6;
अनन्या पाटील वि.वि.डायना पटेल 13-11,11-7,11-2;
श्रीनिका उमेकर वि.वि.सारा गांधी 11-9,6-11,11-7,14-12;
आद्या गवत्रे[४] वि.वि.श्रेया कोठारी 11-5,11-8,11-5;
नीरजा देशमुख[3] वि.वि.स्पृहा बोरगावकर 11-9,12-10,11-6;
श्रेया गायकवाड वि.वि.मेधा कोत्रा 11-9,11-8,11-9;
तनया अभ्यंकर वि.वि.स्पृहा गुजर 11-6,11-4,11-6;
सई कुलकर्णी[2] वि.वि.ईशा जोशी 11-8,11-8,11-6 

17 वर्षांखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
अद्वैय हुद्दर[1] वि.वि.पुष्कर चक्रदेव 12-10,11-6,12-10; 
नील नवरे वि.वि.नीरज नांदेडे 12-10,11-8,9-11,12-10;
निशाद लेले[5] वि.वि. विहान घाटकर 11-7,11-9,11-7; 
श्रेयस माणकेश्वर[4] वि.वि.वरद माळवडकर 11-5,11-5,11-3;  
अनुज फुलसुंदर[3] वि.वि.अर्णव सरपोतदार 11-8,12-10,11-8;
स्वरूप भाडळकर[6] वि.वि.रयान लेले 11-3,11-7,12-10; 
वरदन कोलते वि.वि.शारंग गवळी[2] 11-7,7-11,11-7,11-7
  

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*