सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का 

पुणे, 26 ऑगस्ट, 2026: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स 19 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात वीरेन सेठ, हार्दिक दिव्यांश, कार्तिक दुबे यांनी तर, मुलींच्या गटात आदर्शिनी श्री बूपथी बालाजी, धिष्ठा सिंघा गोपीनाथ यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. 

पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित वीरेन सेठ याने नवव्या मानांकित भारताच्या अश्विन लेनिन मुथुराजचा 21-10, 10-21, 21-10 असा तर, हार्दिक दिव्यांशने चौदाव्या मानांकित कार्तिक रूपा सुहासचा 21-11, 21-16 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. कार्तिक दुबेने बाराव्या मानांकित आरुष पावसकरवर 17-21, 21-12, 21-18 असा सनसनाटी विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत तेराव्या मानांकित बोर्निल आकाश चांगमाईने अनयन बोराहचे आव्हान 21-15, 19-21, 21-17 असे मोडीत काढले. तिसऱ्या मानांकित साई भत्राजूने वैभव सिंगला 21-18, 23-21 असे नमविले. 

मुलींच्या गटात आदर्शिनी श्री बूपथी बालाजी हिने सहाव्या मानांकित राधा गाडगीळचा 21-12, 21-10 असा सहज पराभव केला. धिष्ठा सिंघा गोपीनाथने सातव्या मानांकित हासना श्री मल्लावरपूचे आव्हान 19-21, 21-14, 13-08 असे संपुष्टात आणले. ऋषिका नंदीने निशिका गोखेचा 21-14, 21-10 असा तर, 
युतीका चव्हाणने लावण्या कार्कीचा 21-15, 21-10 असा पराभव करून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे मानद सर चिटणीस सीए रणजीत नातु, खजिनदार सारंग लागू, सह सचिव आनंद जोशी, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, गिरीश नातू, मिहीर रतनजामकर आदी मान्यवर उपस्थित होते.  निकाल: 19 वर्षांखालील मुले: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी:
देव रुपारेलिया(भारत) (1)वि.वि.आर्वेन नौफल रेनाल्डी(इंडोनेशिया) 21-17, 21-19; 
 हार्दिक दिव्यांश(भारत)वि.वि.कार्तिक रूपा सुहास(भारत)(14) 21-11, 21-16;
निश्चल गौडा(भारत)वि.वि.देव रावत(भारत) 21-10, 19-21, 21-11;
 वीरेन सेठ(भारत)वि.वि.अश्विन लेनिन मुथुराज(भारत)(9) 21-10, 10-21, 21-10;   
साई भत्राजू(भारत)(3) वि.वि.वैभव सिंग(भारत)21-18, 23-21;
लक्ष्मी स्वेतन तमातमाला(भारत) वि.वि.वझीर सिंग(भारत)21-14, 21-16;
प्रणव मंजुनाथ(भारत) (7)वि.वि.सचिन जेटी जय गणेश(भारत) 21-16, 15-21, 21-10;
मोहम्मद नफीझ रफी स्मिथा(भारत)(11) वि.वि.चेस सिजो(भारत) 22-20, 21-07; 
कार्तिक दुबे(भारत)वि.वि.आरुष पावसकर(भारत)(12) 17-21, 21-12, 21-18; 
शौर्य अगरवाल(भारत)वि.वि.शाहिदी शरिझवान (मलेशिया) 21-18, 21-14;    
निश्चल चंद(भारत)(16) वि.वि. मनकु टाकू(भारत)21-13, 21-09;
सॅम्युअल तमंग(भारत)(4) वि.वि.मालसालुआ एम(भारत)27-25, 18-21, 21-16;  
अर्जुन रेड्डी अलुगुवेल्ली(भारत) वि.वि.नैवैद्य तोंडे(भारत)21-11, 21-13;
बोर्निल आकाश चांगमाई(भारत)(13) वि.वि.अनयन बोराह(भारत)21-15, 19-21, 21-17; 
जगशेर सिंग खंगुर्रा(भारत)(2) वि.वि.एल्विन जेफरसन कुसुमा(इंडोनेशिया) 21-18, 21-19;

मुली:
लक्ष्या राजेश(भारत) (1)वि.वि. अक्षिता मनरल(भारत) 21-14, 21-09;    
विजया लक्ष्मी बोड्डू(भारत)वि.वि.केतकी थिटे(भारत) 21-18, 21-13;
बाला मानविथा रेड्डी आलम(भारत)वि.वि.श्रावणी बिरादार(भारत) 21-14, 21-07;
पट्टनून थियानापरपोर्नचोक(थायलंड) वि.वि.हरिणी राजा(भारत) 21-18, 21-16;    
मोक्षिता अशोककुमार(भारत) वि.वि.समृद्धी श्रेष्ठा(भारत)21-04, 21-04;
रिधीमा सरपाटे(भारत) वि.वि.सौम्या भटनागर(भारत)21-19, 21-13;
ऋषिका नंदी (भारत) वि.वि.निशिका गोखे (भारत)21-14, 21-10;
आदर्शिनी श्री बूपथी बालाजी(भारत) वि.वि.राधा गाडगीळ(भारत)(6)21-12, 21-10;
दिशा संतोष(भारत)(3)वि.वि.अक्षया चौधरी आलुरु (भारत) 21-10, 21-12;
युतीका चव्हाण(भारत)वि.वि.लावण्या कार्की(भारत)21-15, 21-10;
धिष्ठा सिंघा गोपीनाथ(भारत)वि.वि.हासना श्री मल्लावरपू(भारत)(7)19-21, 21-14, 13-08सामना सोडून दिला;
एव्हाना त्यागी(भारत)वि.वि.वैणवी थाडुरी(भारत) 21-18, 13-21, 21-18;

पुरुष दुहेरी: पहिली फेरी:
शोर्या जाव्वाजी/अर्णव शर्मा (भारत)वि.वि.सौर्य महर्जन/सुबिन श्रेष्ठ(नेपाळ)21-08, 21-15;
श्रेयस चंद्र शेखर/मयुख देशल्ली भुवनेश्वरा(भारत)वि.वि. दिव्यम केजरीवाल/सुभ्रा केतन मल्लिक 21-16, 24-22;
आर्यबका ओक्ता डिसाबियन/मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया(इंडोनेशिया)वि.वि.ओझस जोशी/अवधूत कदम(भारत)21-18, 21-17;
योगांश सिंग/आथिश श्रीनिवास पीव्ही(भारत)(3)वि.वि.यदुनंदन केंचय्या/अमिथ नटराज(भारत) 21-23, 21-17, 21-12;मुली दुहेरी:
चन्थरात मर्ंदाकुल/पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन(थायलंड)वि.वि.शरयू रांजणे/सोयरा शेलार (भारत) 21-14, 19-15;
अक्षया चौधरी आलुरु/गगना श्री चौधरी कोलापनेनी (भारत)वि.वि.अस्मिता खत्री/रिहाना शेरचन(नेपाळ) 21-11, 21-09;
वर्ण प्रभुनंद/सुहिना रॉय (भारत)वि.वि.यांगचेन डोलकर/त्शेरिंग डेकी यांगडेन(भूतान) 21-05, 21-07;

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*