शिवसेना प्रणित रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन
शिवसेना प्रणित रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी
ज्योती कदम यांना निवेदन
भोसरी येथील कृष्णा जनरल हॉस्पिटलमध्ये दिपाली संतोष ईरछे या मुलीचे उपचारदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे त्या डॉक्टरांवर आणि हॉस्पिटल वर तत्काळ कारवाई करण्यात यावी याकरिता शिवसेना प्रणित रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी येथे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले होते. यावेळी सुनिता संतोष ईरछे, संतोष रामलाल ईरछे,आकाश उत्तम ईरछे, रवी गणेश उतपुरे, सुनील गोटीराम लिंबोळे, किरण हरिश्चंद्र उतपुरे, युवराज सुंदर सुट्टे, आदी उपस्थित होते.
कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने पीडित मुलीचे आई-वडील आणि नातेवायकांकडून सोमवारी दिनांक 31/8/ 2026 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेना प्रणित रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांनी दिला.
Comments
Post a Comment