मर्सिडीज-बेंझने भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च केल्या खास सर्व्हिस योजना; लक्झरी कार मालकीचा अनुभव होणार आता आणखी शानदार


मर्सिडीज-बेंझने भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च केल्या खास सर्व्हिस योजना; लक्झरी कार मालकीचा अनुभव होणार आता आणखी शानदार

 

७ वर्षे जुन्या मर्सिडीज-बेंझ कार्सच्या देखभालीचा एकूण खर्च कमी करण्यासाठी 'सर्व्हिस सिलेक्ट' योजनेची घोषणा; मुंबईतील सर्वात मोठ्या लक्झरी सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन आणि लॉन्च केला भारतातील पहिला एआयवर चालणारा ऑटोमेटेड 'वेहिकल स्कॅनर'.
 

हा मर्सिडीज-बेंझ वेहिकल स्कॅनर भारतातील कार कंपनीने सुरू केलेला पहिला एआयवर चालणारा ऑटोमेटेड स्कॅनर आहे; जो कार सुरू असतानाच तिचा संपूर्ण ३६०° डिजिटल रेकॉर्ड नोंदवतो. त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा मिळते, शिवाय वेळेची मोठी बचत होते.
 

हा वेहिकल स्कॅनर जर्मनी, इटली, कोरिया, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड आणि टर्की यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आधीपासूनच यशस्वीरित्या कार्यरत आहे.
 

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, संतोष अय्यर म्हणाले, “आम्ही जुनी विचारसरणी आणि सर्व्हिसिंगच्या सध्याच्या पद्धतींमध्ये बदल करून, ग्राहकांच्या सोयीसाठी एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर करत आहोत; जेणेकरून विक्रीनंतरच्या सेवांमध्येही मर्सिडीजसारखी सर्वोत्तम गुणवत्ता (Mercedes of Service) देता येईल. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही आमच्या खास ग्राहकांसाठी गाडीच्या देखभालीचा एकूण खर्च कमी करत आहोत, ज्यामुळे गाड्यांची सर्व्हिसिंग अधिक जलद व उत्तम होईल आणि ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर अधिक चांगले मूल्य मिळेल. भारतातील पहिल्या एआय-संचालित, ऑटोमेटेड वेहिकल स्कॅनरची सुरुवात ही पारदर्शकता, विश्वास आणि कामाचा वेग वाढवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. यामुळे मर्सिडीज-बेंझच्या ग्राहकांना गाडी बाळगण्याचा अप्रतिम अनुभव मिळेल. एकीकडे 'सर्व्हिस सिलेक्ट' सारख्या योजना आमच्या सध्याच्या ग्राहकांसाठी देखभालीचा खर्च कमी करतात, तर दुसरीकडे मुंबईतील सर्वात मोठ्या लक्झरी सर्व्हिस सेंटरची सुरुवात आमच्या ग्राहकांप्रती असणारी आमची दृढ वचनबद्धता दर्शवते. आमच्या ग्राहकांना मर्सिडीज-बेंझच्या या नवीन आणि अनोख्या सर्व्हिस उपक्रमांमधून भरपूर फायदे मिळतील.”

 

भारतातील पहिला एआय-संचलित ऑटोमेटेड वेहिकल स्कॅनर: मुंबईतील जोगेश्वरी येथील 'लँडमार्क कार्स'च्या सर्व्हिस सेंटरमध्ये हा स्कॅनर सुरू करण्यात आले आहे.
पारदर्शकता आणि विश्वास: ग्राहक आपल्या गाडीच्या बाहेरील भागाची सविस्तर तपासणी स्वतः पाहू शकतात. तसेच XENTRY स्कॅनर'च्या एआय फीचरमुळे त्यांना गाडीची अचूक माहिती त्वरित मिळते. यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला होईल.
वेगवान तपासणी: हाय-रिझोल्युशन कॅमेऱ्यांमुळे गाडीच्या बाहेरील स्थितीची स्वयंचलित तपासणी होते. गाडीवर कुठेही स्क्रॅच किंवा नुकसान असल्यास एआय तंत्रज्ञान ते त्वरित शोधून काढते, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होते.
एआय-संचलित आधुनिक वाहन तपासणी: यामध्ये सहज आणि सोपी तपासणी, ३६०-डिग्री वेहिकल असेसमेंट, एआय आधारित डॅमेज डिटेक्शन, ओळख व गोपनीयतेचे संरक्षण, टायर व वाहनाची अचूक माहिती आणि इन्स्टंट स्कॅनिंग अशा सुविधा मिळतात.
मर्सिडीज-बेंझकडून सर्वात कमी मेंटेनन्स खर्च:
स्टार ईझ (STAR EASE) सर्व्हिस पॅकेज: ३ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि ६ वर्षांपर्यंत वॉरंटी वाढवण्याची सोय.
सर्व्हिस सिलेक्ट (Service Select): ७ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांच्या ठराविक पार्ट्सवर २५% पर्यंत बचत. सोबत मोबिलिओ लाईटचे (Mobilio Light) फायदे, पार्ट्सवर २ वर्षांची वॉरंटी आणि तज्ञांच्या देखरेखीमुळे गाडीची रिसेल किंमत टिकून राहण्यास मदत.
सर्वात मोठे सेल्स आणि सर्व्हिस नेटवर्क:मर्सिडीज-बेंझने १४ लक्झरी सेंटर्ससह मुंबईतील आपले नेटवर्क अधिक मजबूत केले आहे. तसेच, लँडमार्क कार्सने मुंबईतील सर्वात मोठे लक्झरी सर्व्हिस सेंटर सुरू केले आहे.
लक्झरी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सर्व्हिस: संपूर्ण भारतात ९० पेक्षा जास्त सर्व्हिस टचपॉइंट्स, १२०० पेक्षा जास्त सर्व्हिस बे, ४२०० पेक्षा जास्त कर्मचारी, दररोज १२,५०० पेक्षा जास्त पार्ट्सची विक्री आणि देशभरात दर मिनिटाला ३ गाड्यांची सर्व्हिसिंग केली जाते.
भविष्यातील विस्तार: मर्सिडीज-बेंझ २०२६ च्या अखेरपर्यंत आपले २० 'MAR 20X' टचपॉइंट्स वाढवणार आहे.
गुंतवणूक: फ्रेंचायझी पार्टनर्सकडून ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 

मुंबई: भारतातील सर्वात लोकप्रिय लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझने आपल्या ग्राहकांचा लक्झरी कार मालकीचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी आणि गाड्यांच्या देखभालीचा एकूण खर्च कमी राखण्यासाठी अनेक नवीन सर्व्हिस योजनांची घोषणा आज केली. याच अनुषंगाने, कंपनीने मुंबईतील 'लँडमार्क कार्स' सर्व्हिस सेंटरमध्ये देशातील पहिला आधुनिक, एआय-संचालित ऑटोमेटेड 'वेहिकल स्कॅनर' लॉन्च केला आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*