चित्रपट कलाकारांचा क्रिकेटपटूंच्या भूमिकेचा हटके प्रयोग कौतुकास्पद :पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटीलविश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे शानदार उद्घाटन



चित्रपट कलाकारांचा क्रिकेटपटूंच्या भूमिकेचा हटके प्रयोग कौतुकास्पद :
पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील

विश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे शानदार उद्घाटन 

सांगलीत अभिजीत कदम मेमोरियल फौंडेशनच्यावतीने आयोजित विश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा थरार

सांगली :
प्रत्येकाला आपल्या भूमिकेपेक्षा काहीतरी वेगळे करायचे असते. अशाच पद्धतीने राजकारणाच्याही पलिकडे मराठी चित्रपट कलाकार, राजकारणी, अधिकारी आणि जनतेला ‘विश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लिग’च्या माध्यमातून खेळाडूच्या भूमिकेत आणण्याचा भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी केलेला हा अभिनव हटके प्रयोग कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सांगलीचे पालकमंत्री तथा उच्च तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. येथील भारती विद्यापीठ प्रांगणात आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली अभिजीत कदम मेमोरियल फौंडेशनच्यावतीने आच्छादित 
सुसज्ज टर्फच्या मैदानात विद्युत प्रकाश झोतात ‘विश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग’चा भव्य प्रारंभ झाला. त्याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार विशाल पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. सुहास बाबर, जिल्हा परिषदेेच्या अध्यक्षा संगीता पाटील, संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी, आयुक्त संजीता महोपात्रा, कडेगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम, संजय भोकरे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अभिनेते प्रविण तरडे उपस्थित होते.

या स्पर्धेत ज्येष्ठ अभिनेते प्रवीण तरडे, संजय जाधव, सौ. स्नेल तरडे, शशांक केतकर, सौरभ गोखले, हार्दिक जोशी, प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्यासह सुमारे ५० हून अधिक कलाकारांच्या उपस्थितीने मराठी चित्रपटसृष्टीच सांगलीतील क्रिकेट मैदानात अवतरली.

ना. पाटील म्हणाले, सांगलीसारख्या ठिकाणी अशा पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करण्याचे धाडस लागते. ते साहजिकच डॉ. विश्वजीत कदम यांनी केले आहे. या निमित्ताने सांगली जिल्ह्याला क्रिकेट आणि कलाकारांना जवळून पाहून संभाषणाची पर्वणी दिली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार चांगल्या पध्दतीने चित्रपट, मालिकांमध्ये अभियन करतात. क्रिकेट खेळून ते चांगल्या पध्दतीने क्रीडा कौशल्यही दाखवतील. यापुढेही चित्रपट सृष्टी अधिक चांगली निर्माण होण्यासाठी एक चांगली टीम निर्माण करा, त्याची नियमावली तयार करावी, त्यासाठी जेष्ठ अभिनेते म्हणून प्रविण तरडे यांनी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे दुबई व थायलंड येथे दोन पर्व संपन्न झाले. सांगलीत यावर्षी लीगचे नियोजन करण्याची मागणी झाली. त्यासाठी माझ्याकडे पाठपुरावा केला. राज्यातील अनेक कलाकार येणार असल्यामुळे नियोजनात कुठेही कमी पडू नये आणि सांगलीचे नाव अधिक चांगले व्हावे, यासाठी भारती विद्यापीठाने यजमानपद घेतले. यातून स्पर्धेची भव्य तयारी केली. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी बहुजन समाजातील गरीब गरजू व वंचित उपेक्षित समाजाला शिक्षण मिळावे म्हणून भारती विद्यापीठाची उभारणी केली. भारती विद्यापीठ दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देत प्रोत्साहन देण्यासाठी सदैव आग्रही असते. कडेगांव येथे अव्वल दर्जाचे सर्व सेवा सुविधांनी युक्त भव्य कुस्ती संकुल उभा करून महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहतात. खा. विशाल पाटील हे कदम कुटुंबातील एक सदस्य आहेत. लोकसभेत त्यांचे चौकार, षटकार सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक करताना निर्माते प्रविण तरडे म्हणाले, मी भारती विद्यापीठामध्ये पहिली ते एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले याचा मला अभिमान वाटतो. सांगली शहराची ओळख नाट्यपंढरी अशी आहे. क्रीडा विश्वात देखील सांगलीचे नाव आहे. महिला खेळाडू स्मृती मानधनासारखे खेळाडू या सांगलीत तयार झाले आहेत. त्यामुळे नाट्यपंढरी बरोबर आता क्रीडा क्षेत्रात देखील सांगली आता अव्वल आहे.


यावेळी वेलणकर अनाथ बालकाश्रम सांगली या संस्थेस डॉ. पतंगराव कदम प्रतिष्ठानकडून तीन लाख रुपये निधीच्या मदतीचा चेक प्रदान करण्यात आला.


सौ. स्नेहल तरडे यांचा रणरागिणी पुरस्काराने गौरव 

देऊळ बंद २ या चित्रपटाच्या दैदीप्यमान यशाबद्दल मुख्य अभिनेत्री सौ. स्नेहल प्रवीण तरडे यांचा भारती विद्यापीठाच्यावतीने ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते डॉ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील यांच्यासह मान्यवारांच्या उपस्थितीत चांदीची तलवार देऊन ' रणरागिनी ' या पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला. 



कलाकारांचे चौकार अन् सांगलीकरांचा जल्लोष
या क्रिकेट लीगमध्ये अभिनेते प्रविण तरडे यांच्यासह संजय जाधव, राणादा फेम हार्दिक जोशी, ‘आज्या’ नितीश चव्हाण, नृत्यांगणा गौतमी पाटील, हास्यजत्रा फेम गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परब, शशांक केतकर, धनंजय पोवार यांच्यासह अनेक कलाकारांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून क्रीडा कौशल्य दाखवले तसेच अनेकांनी उत्कृष्ट गोलंदाजीही केली. उपस्थित सांगलीकरांनी मोठ्या जल्लोषात त्यांच्या खेळाला उस्फूर्त दाद दिली.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*