नितीन गडकरी सिंबायोसिस येथे ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’मध्ये साधणार संवाद‘विकसित भारताच्या दिशेने पायाभूत सुविधांचा विकास’ विषयावर व्याख्यान
नितीन गडकरी सिंबायोसिस येथे ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’मध्ये साधणार संवाद
‘विकसित भारताच्या दिशेने पायाभूत सुविधांचा विकास’ विषयावर व्याख्यान
पुणे: १३/०८/२०२६:- सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे सोमवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता विद्यापीठाच्या लवळे, पुणे येथील कॅम्पस मध्ये फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिताना मार्गदर्शन करणार आहेत. "पायाभूत सुविधांचा विकास: विकसित भारताचा मार्ग" (Infrastructure Development: The Road to Viksit Bharat) या विषयावर ते विशेष व्याख्यान देतील.
प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार, संस्थापक आणि अध्यक्ष, सिंबायोसिस हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका सिंबायोसिस व कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व डॉ. रामकृष्णन रमण, कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आदी इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
सदर ई-मेल बरोबर कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका जोडलेली आहे.
Comments
Post a Comment