अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ औध-बालेवाडी-बाणेर शाखा तर्फे चतुश्रृंगी टेकडीवर वृक्षारोपण " *औंध-बाणेर-बालेवाडी शाखेतर्फे चतुर्श्रुंगीच्या टेकडीवर पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.*, महासंघाचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.
"अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ औध-बालेवाडी-बाणेर शाखा तर्फे चतुश्रृंगी टेकडीवर वृक्षारोपण "
*औंध-बाणेर-बालेवाडी शाखेतर्फे चतुर्श्रुंगीच्या टेकडीवर पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.*, महासंघाचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.
या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयीन युवकांपासून ते ७५+ वर्षीय महिला - पुरुषांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी पिंपळ , वड, आंबा व अंजीर ही झाडे लावण्यात आली.
औंध बाणेर बालेवाडी शाखा तसेच वारजे शाखा आणि हडपसर शाखा येथून ४५ हुन अधिक जणांनी या वृक्षारोपणाला उपस्थिती लावली.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मंदार रेडे आवर्जून उपस्थित होते व वृक्षारोपण कार्यात सहभाग घेतला. ग्रीन हिल्स तर्फे संजय सूर्यवंशी व मनीष देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
वारजे शाखेचे श्री हेमंत कासखेडीकर, शैलाताई सोमण तसेच हडपसर शाखेचे पदाधिकारी राजेंद्र कुलकर्णी व औंध शाखेचे अनेक पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली व वृक्षारोपण कार्यात सहभाग घेतला.
Comments
Post a Comment