प्रज्ञेतून मीपणा गळून पडतो, त्यावेळी स्थितप्रज्ञता निर्माण होते*जगद्गुरु कृपांकित डॉ. पंकज उर्फ चेतनानंद महाराज पुणेकर यांचे काल्याचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास कीर्तन महोत्सव


*प्रज्ञेतून मीपणा गळून पडतो, त्यावेळी स्थितप्रज्ञता निर्माण होते*
जगद्गुरु कृपांकित डॉ. पंकज उर्फ चेतनानंद महाराज पुणेकर यांचे काल्याचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास कीर्तन महोत्सव

पुणे : जीवन हे सत्य संशोधन आहे. सत्य संशोधनासाठी स्थितप्रज्ञतेची गरज असते. विकाररहित शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञेतून मीपणा गळून पडतो, त्यावेळी स्थितप्रज्ञता निर्माण होते. ती स्थितप्रज्ञता तुमच्यात आली की पांडुरंग दर्शन देतो, असे प्रतिपादन जगद्गुरुकृपांकित डॉ. पंकज उर्फ चेतनानंद महाराज पुणेकर यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात त्यांचे काल्याचे कीर्तन झाले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जगद्गुरु कृपांकित डॉ. पंकज उर्फ चेतनानंद महाराज पुणेकर म्हणाले, ‘चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं’ या अभंगाचा दाखला देत इंद्रियांना आजच नियंत्रणात ठेवा. नाहीतर गाय खाल्ल्यानंतर रवंथ करते; आपल्याला रवंथ करायला देखील वेळ मिळणार नाही, इतक्या लवकर जीवन संपते. रवंथ आपल्याला चिंतनाचे करता आले पाहिजे, नामाचे करता आले पाहिजे. अहंकार गेला पाहिजे आणि अभिमान संपून टाकायला पाहिजे.

ते पुढे म्हणाले, इंद्रियांना तुम्ही लोभात, मत्सरात टाकता. घरामध्ये जे निपजते, तेच अपत्याच्या पोटी जाते. आपल्याला इंद्रिये एका ठिकाणी आणावी लागतात. त्याच्यामुळेच पाप घडतात. तुमच्या मुक्तीचा सगळ्यात मोठा विरोधक तुमचे कर्म आहे. अग्नी हे ज्ञानाचे प्रतीक आहे. शरीराला ज्ञानाच्या अग्नीने तप्त करून संपवल्याशिवाय जीव ब्रह्मैक्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*