ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे : भारतातील ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी परिसंस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था (CIRT), आऑटोसिफू प्रा.लि. आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६" ( "Leadership and Institutional Engagement Meet on Automotive Cybersecurity Talent Development Ecosystem" ) या उपक्रमाचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कान्फ्रेंस द्वारे करण्यात आले.
वाहनांमध्ये सॉफ्टवेअर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सुरक्षित आणि विश्वासार्ह मोबिलिटीसाठी सायबर सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ता सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
कार्यक्रमास डॉ. देवेंद्र सिंह, संचालक, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) फारुख मखदूम, प्रमुख – एमडीसी व ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा, CIRT, प्रिया गुजराथी, संस्थापक संचालक, जगमंगल सोशल फाउंडेशन, डॉ. शहाजी सोलुंखे, आयपीएस, विशेष पोलीस महानिरीक्षक (निवृत्त), जगन्नाथ तिवारी
संचालक व सह-संस्थापक, ऑटोसिफू प्रा. लि., विक्रम पगारे, प्रमुख – ऑपरेशन्स, ऑटोसिफू प्रा. लि., विद्यावाचस्पती विद्यानंद प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी, शैक्षणिक सल्लागार, जगमंगल सोशल फाउंडेशन, राहुल सुलताने, व्वस्थापकीय संचालक,
स, केथ इलेक्ट्रो सर्किट्स प्रा. लि. मिलिंद पगारे, उपाध्यक्ष – संशोधन व विकास (R&D), बजाज ऑटो लिमिटेड लोकेश कुमार, तज्ज्ञ – तांत्रिक प्रशिक्षण व औद्योगिक अनुप्रयोग, स्कोडा-फोक्सवॅगन समूह, महेश शहापुरे
वरिष्ठ उपाध्यक्ष – संशोधन व विकास (R&D), नॉर ब्रेम्से सिस्टिम्स फॉर कमर्शियल व्हेईकल्स, अरुण बिष्ट
वरिष्ठ उपाध्यक्ष – विक्री व विपणन, फिलिप जॉन, विभागीय व्यवस्थापक, अशोक लेलँड,
डॉ. संदीप पाधारवाडकरडॉ. मोहन वामन, डॉ. आशिष पानट, डॉ. संतोष सोनवणे, डॉ. संदीप पाचपांडे, डॉ. आशिष पानट, डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्यासह विविध उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी टॅलेंट डेव्हलपमेंट इकोसिस्टम हा मोबिलिटीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नव्या पिढीतील गुणवंत तरुणांना उद्योगाच्या गरजांनुसार तयार करणे आणि भविष्यातील तांत्रिक आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तज्ज्ञ यांच्यातील मजबूत सहकार्यामुळे भारतात ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असे डॉ. देवेंद्र सिंह, IAS संचालक, (CIRT) यांनी सांगितले.
जागतिक मानकांशी सुसंगत राहून केंद्र सरकारने वाहनांसाठी सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम (CSMS) आणि सॉफ्टवेअर अपडेट मॅनेजमेंट सिस्टम (SUMS) या प्रणाली नियामक चौकटीत समाविष्ट केल्या आहेत. यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रात सुरक्षिततेला अधिक प्राधान्य मिळणार आहे. असे ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रमुख फारुख मखदूम यांनी सांगितले.
१५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत बीसीए, एमसीए आणि अभियांत्रिकी शाखेतील ५०,००० विद्यार्थ्यांसाठी ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी विषयावरील पहिल्या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यातील सॉफ्टवेअर-आधारित वाहन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा धोके आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाईल. अशी माहिती तेजस गुजराथी यांनी दिली.
CIRT च्या वतीने सांगण्यात आले की, आधुनिक वाहने आता केवळ यांत्रिक साधने राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. त्यामुळे वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
ACTDE हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तज्ज्ञ संस्थांमधील दीर्घकालीन सहकार्याचा एक परिसंस्था विकास उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा, वाहन सुरक्षा चाचण्या आणि उद्योगाशी संबंधित अनुभव देऊन भविष्यातील ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ घडविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.
"भविष्यातील मोबिलिटी ही केवळ इलेक्ट्रिक किंवा कनेक्टेड वाहनांवर अवलंबून राहणार नाही, तर सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहनांवर आधारित असेल," असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून सुरक्षित वाहन तंत्रज्ञानाच्या दिशेने भारताची वाटचाल अधिक मजबूत होणार आहे.
---------
ऑटोमोटिव साइबर सिक्योरिटी इकोसिस्टम को मजबूत करने के लिए सामूहिक प्रयास जरूरी – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
50 हजार विद्यार्थियों के लिए ऑटोमोटिव साइबर सिक्योरिटी पर जनजागरूकता अभियान
Comments
Post a Comment