मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रता आणून परिवर्तन घडवणारे महाराष्ट्रातील पहिले "आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय " पुण्यात स्थापन झाले आहे.
मालमत्ता नोंदणी सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना जागतिक दर्जाचा सेवा अनुभव
मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रता आणून परिवर्तन घडवणारे महाराष्ट्रातील पहिले "आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय " पुण्यात स्थापन झाले आहे.
मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रता आणून परिवर्तन घडवणारे महाराष्ट्रातील पहिले "आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय " पुण्यात स्थापन झाले आहे.
जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम नागरिक सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित, अत्याधुनिक केंद्र.
सर्व केंद्रांवर कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकांचा अनुभव सुधारण्यासाठी संपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधा आणि आधुनिक सेवा वितरण प्रणाली.
पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नागपूर येथे आणखी ४ ' आदर्श दुय्यम निबंधक कार्यालये' (Model Sub-Registrar Offices) सुरू केली जाणार आहेत.
मालमत्ता नोंदणी सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना जागतिक दर्जाचा सेवा अनुभव उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, विश्वसनीय तंत्रज्ञान सेवांमधील जागतिक अग्रणी संस्था ‘व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि.’ (VPS Global Services Pvt Ltd.) आणि ‘वुई एक्सेल सॉफ्टवेअर प्रा. लि.’ (WE Excel Software Pvt Ltd.) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे महाराष्ट्रातील पहिले ‘आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय’ (Model Sub-Registrar Office - SRO) सुरू करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पुण्यातील नवीन "आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय " चे उद्घाटन १३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे नोंदणी महानिरीक्षक (IGR) श्री. रवींद्र बिनवडे (भा.प्र.से.), 'व्हीएफएस ग्लोबल'चे मुख्य वाणिज्य अधिकारी आणि व्यवसाय विकास प्रमुख श्री. जितेन व्यास तसेच महाराष्ट्र शासनातील इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले: "पुण्यातील महाराष्ट्राच्या पहिल्या 'आदर्श दुय्यम निबंधक कार्यालया'चे (Model Sub-Registrar Office) उद्घाटन, ही मालमत्ता नोंदणी प्रक्रियेचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा अधिक नागरिक-केंद्रित बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. या उपक्रमाद्वारे, आम्ही सरकारी देखरेख, आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल प्रणाली आणि कार्यक्षम सेवा वितरण यांचा मेळ घालत आहोत, जेणेकरून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर अनुभव मिळेल. प्रशासकीय कामकाज आणि नियमांचे पालन यांबाबत सर्वोच्च मानके राखत, गर्दी आणि प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधी यांसारख्या दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 'आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय' (मॉडेल एसआरओ) हा उपक्रम आखण्यात आला आहे. हे पहिले केंद्र कार्यान्वित झाल्याचा आम्हाला आनंद आहे आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या प्रारूपाचा विस्तार करण्यास आम्ही उत्सुक आहोत."
अर्जदारांसाठी 'आदर्श दुय्यम निबंधक कार्यालया'चे (Model Sub-Registrar Office) चे फायदे:
सुव्यवस्थित कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानाधारित सेवा वितरणाच्या माध्यमातून दस्त नोंदणी प्रक्रियेचा जलद, कार्यक्षम व वेळेवर निपटारा.
नागरिकांना अधिक सुखद, सुसज्ज व दर्जेदार सेवा अनुभव मिळावा यासाठी प्रशस्त, आधुनिक व पूर्णतः वातानुकूलित कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी व कार्यालयीन भेटीदरम्यान अधिक आरामदायी अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने वाय-फाय (Wi-Fi) सुविधेसह सुसज्ज, प्रशस्त व आरामदायी प्रतीक्षालयाची (waiting lounges) व्यवस्था करण्यात आली आहे.
नोंदणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने पार पाडण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित प्रणालींची उपलब्धता.
नोंदणी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, सहाय्य व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी सेवा प्रतिनिधींची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांचा आराम, सुविधा आणि समाधानकारक सेवा अनुभव लक्षात घेऊन अल्पोपहार, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर डिस्पेंसर तसेच इतर नागरिक-स्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुखता सुनिश्चित करून नागरिकांचा एकूण सेवा अनुभव अधिक गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह व समाधानकारक करण्यावर भर.
आधुनिक तंत्रज्ञान, सर्वकष पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित व्यावसायिक सहाय्य यांचा प्रभावी संगम साधणाऱ्या नागरिक-केंद्रित सेवा मॉडेलद्वारे आधुनिक, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण सार्वजनिक सेवा अनुभव प्रदान करण्यात येत आहे.
२०२६ च्या सुरुवातीस ‘व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि.’ (VPS Global Services Pvt Ltd.) आणि ‘वुई एक्सेल सॉफ्टवेअर प्रा. लि.’ (WE Excel Software Pvt Ltd.) यांच्या संयुक्त उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयामार्फत पाच वर्षांचा करार प्रदान करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत राज्यभर टप्प्याटप्प्याने एकूण ६० ‘आदर्श दुय्यम निबंधक कार्यालये’ (Model Sub-Registrar Offices - SROs) कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मालमत्ता नोंदणी सेवांचे आधुनिकीकरण, सुलभीकरण आणि डिजिटल परिवर्तन साध्य करण्याच्या उद्देशाने या कार्यालयांमध्ये अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा, आधुनिक सेवा व्यवस्थापन प्रणाली तसेच प्रशिक्षित सेवा प्रतिनिधींची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येणार आहे. ही आदर्श दुय्यम निबंधक कार्यालये विद्यमान शासकीय नोंदणी कार्यालयांसोबत पर्यायी सेवा केंद्रे म्हणून कार्यरत राहतील, तर विद्यमान सह दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज पूर्ववत सुरू राहणार आहे.
Comments
Post a Comment