नीट पेपर फुटी प्रकरणी आपल्या न्यायहक्कासाठी आंदोलन
नीट पेपर फुटी प्रकरणी आपल्या न्यायहक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि अश्रुधूर सोडण्याचे आदेश देणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा सुखकर होण्यासाठी तसेच गृहमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन होउ नये यासाठी पुणे शहरातील अनेक शिवसेना पदाधिकारी सहसंपर्कप्रमुख संजय मोरे व शिवसैनिकांना समर्थ पोलीस ठाण्यात डिटेन करून ठेवले आहे. एवढा घाबरट गृहमंत्री पाहिला नाही. अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांनापण स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले.
समर्थ पोलीस ठाण्यात सहसंपर्कप्रमुख संजय मोरे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, राजेंद्र शहा, राजेश मोरे, अजय परदेशी, विजय नायर, सोमनाथ कोकणे, बकुळ डाखवे, जितेंद्र जठार, रमेश परदेशी, मुरली विलकर, नंदू काळे, नितीन दलभंजन, परवेश राव, अजय भांबुरे, अभिषेक जगताप, महिला आघाडीच्या पद्माताई सोरटे, रोहिणी कोल्हाळ, सुशीला नायर, अरूण कदम, लहु शिंदे, राजमहंमद शेख, बंडू माने, दशरथ बेलेकर, रमेश कामकर, अन्वर सैय्यद ई शिवसैनिक होते.
Comments
Post a Comment