अभिनवच्या एनएसएस विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधला कृतज्ञतेचा धागा

*अभिनवच्या एनएसएस विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधला कृतज्ञतेचा धागा*

पुणे : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून अभिनवच्या एनएसएसच्या विद्यार्थिनींनी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे केले. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बांधवांनीही विद्यार्थिनींच्या या प्रेमळ भावनेचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले.
या उपक्रमातून ‘राखीचा धागा केवळ नात्याचा नसतो, तो विश्वास आणि कर्तव्याची जाणीवही दृढ करतो’ हा सुंदर संदेश विद्यार्थिनींनी दिला.
सेक्रेटरी सुनीता जगताप म्हणाल्या "एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रसेवेची भावना, संवेदनशीलता आणि समाजाप्रती कृतज्ञतेची जाणीव निर्माण करण्याचा अभिनवचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. याच सामाजिक जाणिवेचा प्रत्यय या रक्षाबंधनाच्या आणि सायबर सुरक्षा या कार्यक्रमातून आला.
पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधलेली ही राखी म्हणजे त्यांच्या निःस्वार्थ सेवेला दिलेली मानवंदना आणि त्यांच्या सुरक्षादायी कर्तव्याप्रती व्यक्त केलेली मनःपूर्वक कृतज्ञता होय.असे एनएसएस विद्यार्थीनी श्रेया साळुंखे, श्रीष्टी शेट्टी म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी मांडले.
आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सायबर तज्ञ अश्विनी पाटील आणि नीलिमा जाधव यांनी सायबर मधील धोके 
आणि विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टींमध्ये सोशल मीडियावर सतर्क राहायचं याविषयी आपले विचार व्यक्त केले.यावेळी संस्थापक राजीव जगताप, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, उपाध्यक्ष संजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*