राजीव गांधी स्मृती जिल्हा खुली टेनिक्वाइट(रिंग टेनिस) स्पर्धा २०२६



 राजीव गांधी स्मृती जिल्हा खुली टेनिक्वाइट(रिंग टेनिस) स्पर्धा २०२६  

  सतरावी राजीव गांधी स्मृती खुली जिल्हा टेनिक्वाईट (रिंग टेनिस) स्पर्धा -2026 ही दिनांक 18 व 19 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड, पुणे येथे संपन्न झाली. स्पर्धेमध्ये मॉर्डन इंग्लिश स्कूल, भारती विद्यापीठ बालेवाडी ,ढोले पाटील संस्था, युनिटी क्लब, महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन, टी सी कॉलेज बारामती ,गरवारे कॉलेज , डेक्कन एज्युकेशन सोसायटी इत्यादी संस्थेतील सुमारे 175 खेळाडूंनी सहभाग घेतला .
स्पर्धा सब ज्युनिअर 14 वर्षाखालील मुले व मुली ज्युनियर 18 वर्षाखालील मुले व मुली व पुरुष व महिला अशा तीन विविध गटात संपन्न झाली .अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश ढवळे व साहिल खेडेकर तसेच राष्ट्रीय खेळाडू कस्तुरी बाजारे ,आदित्य मिस्त्री, आदित्य जाधव, विराज मोरे लौकिक पिसे, अवंतिका कुर्लेकर इत्यादी खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ संस्थेचे अध्यक्ष मोहन दादा जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रास्ताविक अनिल वर्पे ,सचिव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रथमेश आबनावे, होते .कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी श्री चंद्रकांत पिंपळे ,श्री यशवंत वेदपाठक, स्मिता गांगुर्डे, सौ रुपाली पवार, श्रुती सप्रे यांनी परिश्रम घेतले स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
स्पर्धेचा निकाल 
 14 वर्षाखालील मुली 
प्रथम क्रमांक - आद्या बालवडकर (भारती विद्यापीठ बालेवाडी )
द्वितीय क्रमांक - मानवी चौगुले (मॉडर्न इंग्लिश स्कूल)

 14 वर्षाखालील मुले 
प्रथम क्रमांक -अर्णव लोणारी (उरळी कांचन )
द्वितीय क्रमांक - लोकेश लांडे (भारती विद्यापीठ बालेवाडी)

 18 वर्षाखालील मुली 
प्रथम क्रमांक - कस्तुरी बाजारे डेक्कन एज्युकेशन सोसायटी.
द्वितीय क्रमांक - आयुशी यादव (भारती विद्यापीठ बालेवाडी)
अठरा वर्षाखालील मुले 
प्रथम क्रमांक- मयूर शेलार (उरळीकांचन )
द्वितीय क्रमांक- निहार गोळे 

 महिला गट 
प्रथम क्रमांक - अवंतिका कुर्लेकर (भारती विद्यापीठ बालेवाडी)
 सौ.निकिता बोरगावे ( पुणे) 

पुरुष गट 
प्रथम क्रमांक - प्रथमेश ढवळे (उरुळी कांचन)
द्वितीय क्रमांक- आदित्य मेस्त्री (उरळी कांचन)

सर्व बक्षीस विजेत्यांचा फोटो सोबत पाठवत आहे कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात ही बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती .
             

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*