जेटसिंथेसिसकडून जीईपीएलच्या चौथ्या सीझनची घोषणा; तिसऱ्या सीझनची आठ फ्रँचायझी आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रसारणासह यशस्वी सांगता


जेटसिंथेसिसकडून जीईपीएलच्या चौथ्या सीझनची घोषणा; तिसऱ्या सीझनची आठ फ्रँचायझी आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रसारणासह यशस्वी सांगता


राष्ट्रीय, ११ ऑगस्ट २०२६: जेटसिंथेसिस या डिजिटल एंटरटेनमेंट आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (जीईपीएल) च्या तिसऱ्या सीझनची फायनलसह यशस्वी सांगता झाली. मागील सीझनमध्ये विजेते ठरलेल्या चेन्नई फाल्कन्सने अंतिम सामन्यात सारा तेंडुलकर यांच्या मालकीच्या मुंबई ग्रिझलीज संघाचे कडवे आव्हान परतवून लावत आपले विजेतेपद कायम राखले. गोपाल श्रीनिवासन, मधुसूदना आर. आणि अर्जुन संथानकृष्णन यांच्या सहमालकीच्या चेन्नई फाल्कन्सने रविवारी झालेल्या जीईपीएलच्या तिसऱ्या सीझनच्या फायनलमध्ये मुंबई ग्रिझलीजवर २-१ असा विजय मिळवला.


बेस्ट-ऑफ-थ्री फायनलमध्ये दोन्ही संघांनी पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर झालेल्या निर्णायक तिसऱ्या सामन्यात चेन्नई फाल्कन्सने दोन विकेट्स राखून विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा जीईपीएलचे विजेतेपद पटकावले.


पियूष बन्सल यांच्या मालकीच्या दिल्ली शार्क्सने स्पर्धेत दुसरा रनर-अप क्रमांक मिळवला, तर निखिल कामथ, अंकित नागोरी आणि प्रशांत प्रकाश यांच्या सहमालकीचा बेंगळुरू बॅजर्स संघ चौथ्या स्थानावर राहिला.

मुंबई ग्रिझलीजच्या जेठा रामने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक ४८८ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. चेन्नई फाल्कन्सच्या नदीमने गोलंदाजीमध्ये सर्वाधिक १९ विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली.

चेन्नई फाल्कन्सच्या दीपकनेही फलंदाजीत स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहून इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कार मिळवला.


जेठा रामने ४८८ धावा आणि १४ विकेट्स घेतल्या. या दमदार कामगिरीमुळे त्याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर (एमव्हीपी) ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कारही मिळाला.

**रिअल क्रिकेट™**च्या माध्यमातून साकारलेली जीईपीएल ही लीग सातत्याने भारतातील आघाडीचे उद्योगपती, गुंतवणूकदार आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना आकर्षित करत आहे. या मालकांनी जीईपीएलकडे केवळ प्रायोजकत्व म्हणून न पाहता, दीर्घकाळ उभी राहणारी फ्रँचायझी आणि एक मोठी क्रीडा संस्था म्हणून पाहिले आहे.


ग्रँड फायनलला अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती. यामध्ये मुंबई ग्रिझलीजच्या मालक सारा तेंडुलकर, बेंगळुरू बॅजर्सचे सहमालक प्रशांत प्रकाश, पूनावाला ग्रुपचे चेअरमन डॉ. सायरस पूनावाला, क्राफ्टन इंडियाचे सीईओ सीन सोहन आणि प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री व टेलिव्हिजन प्रेझेंटर मंदिरा बेदी यांचा समावेश होता.


जेटसिंथेसिसचे चेअरमन राजन नवानी म्हणाले, “जीईपीएलने जे साध्य करण्याचे ठरवले होते, त्याचा सीझन ३ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा आहे. आम्हाला केवळ एक टूर्नामेंट नाही, तर एक खरा स्पोर्ट उभा करायचा होता. आठ फ्रँचायझी, आमचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि इतकी चुरशीची फायनल ही जीईपीएलमागची महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात येत असल्याची आणि ती दिवसेंदिवस वाढत असल्याची चिन्हे आहेत. चेन्नई फाल्कन्सचे विजेतेपद कायम राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच हा सीझन यापूर्वीच्या कोणत्याही सीझनपेक्षा मोठा करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक फ्रँचायझीचेही अभिनंदन.” सीझन २ पासून जीईपीएलसोबत जोडलेल्या आणि मुंबई ग्रिझलीजच्या मालक सारा तेंडुलकर म्हणाल्या, “लहानपणापासून मी आजूबाजूला क्रिकेट पाहत मोठी झाले, त्यामुळे जीईपीएल हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता आणि यातून खूप काही शिकायला मिळाले. ई-क्रिकेटमध्येही किती डेडिकेशन आणि हार्ड वर्क लागते, हे पाहून मला सर्वात जास्त जाणवले. मी ज्या क्रिकेटसोबत मोठी झाले, त्याप्रमाणेच या खेळातही मेहनत आणि समर्पणाला तितकेच महत्त्व आहे. मुंबई ग्रिझलीजने या सीझनमध्ये जे साध्य केले, त्याचा मला खूप अभिमान आहे. चेन्नई फाल्कन्सने अप्रतिम खेळ केला आणि ते या विजयाचे पूर्णपणे पात्र आहेत.”


चेन्नई फाल्कन्सचे को-ओनर गोपाल श्रीनिवासन म्हणाले, “चेन्नई फाल्कन्सने आपले विजेतेपद कायम राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आठ अत्यंत स्पर्धात्मक फ्रँचायझी असलेल्या या सीझनमध्ये हे यश मिळवणे आमच्यासाठी आणखी खास आहे आणि याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. जीईपीएल दरवर्षी आपली पातळी आणखी उंचावत आहे. आमचा संघ नव्या स्ट्रॅटेजीज आणि कॅपॅबिलिटीजचा वापर करून सातत्याने स्वतःमध्ये सुधारणा करत आहे आणि बेस्ट इन क्लास राहण्यासाठी काम करत आहे, हे पाहणे उत्साहवर्धक आहे.”


बेंगळुरू बॅजर्सचे को-ओनर प्रशांत प्रकाश म्हणाले, “इतक्या स्पर्धात्मक आठ संघांच्या लीगमध्ये चौथ्या क्रमांकावर राहणे हेच जीईपीएल किती मजबूत झाली आहे, हे दाखवते. या सीझनमध्ये प्रत्येक फ्रँचायझीकडे चांगली डेप्थ होती आणि आठही संघांच्या खेळाची पातळी याआधीच्या तुलनेत स्पष्टपणे उंचावलेली दिसली. एक इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला लीगची हीच वाटचाल पाहायला आवडते. लीग जिंकणे दरवर्षी अधिक कठीण होत आहे, सोपे नाही.”


ग्रँड फायनलला उपस्थित असलेल्या मंदिरा बेदी म्हणाल्या, “जीईपीएलची दरवर्षी होणारी वाढ खरोखरच उल्लेखनीय आहे. आयोजन, व्हेन्यू, खेळाची पातळी, प्रत्येक गोष्ट सातत्याने अधिक चांगली होत आहे. या लीगची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती किती सहज लोकांपर्यंत पोहोचू शकते. तुम्हाला फक्त एक फोन आणि चांगले रिफ्लेक्सेस हवे आहेत. माझ्यासाठी ‘ये हमारा क्रिकेट है’ याचा हाच अर्थ आहे. चेन्नई फाल्कन्स आणि जेटसिंथेसिस या दोघांचेही या विशेष उपक्रमासाठी अभिनंदन.”

सीझन २च्या यशानंतर सीझन ३मध्ये जीईपीएलने आठ पूर्ण फ्रँचायझींच्या रूपात विस्तार केला. यामध्ये

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*