सोनाटाचे नवे 'समिट': मोठ्या स्वप्नांचा ध्यास घेणाऱ्या नव्या पिढीसाठी खास कलेक्शन! ~ लडाखच्या विस्तीर्ण, सुंदर पण खडतर निसर्गापासून प्रेरित, सोनाटाचे नवे ७ घड्याळांचे कलेक्शन आजच्या तरुणाईची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा दर्शवते


सोनाटाचे नवे 'समिट': मोठ्या स्वप्नांचा ध्यास घेणाऱ्या नव्या पिढीसाठी खास कलेक्शन!

 

~ लडाखच्या विस्तीर्ण, सुंदर पण खडतर निसर्गापासून प्रेरित, सोनाटाचे नवे ७ घड्याळांचे कलेक्शन आजच्या तरुणाईची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा दर्शवते

 

राष्ट्रीय, 11th August २०२६: सोनाटाने 'समिट' हे पुरुषांच्या घड्याळांचे नवे कलेक्शन आणले आहे. खास डिझाईन संकल्पनेवर आधारित हे त्यांचे पहिलेच स्टेटमेंट कलेक्शन आहे. अतिशय प्रीमियम आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लडाखच्या अथांग आणि सुंदर निसर्गाचे रूप या सात वेगवेगळ्या घड्याळांमधून जिवंत करण्यात आले आहे. हे खास कलेक्शन आजच्या

अशा तरुणांना नजरेसमोर ठेवून बनवले आहे, जे नेहमी मोठी स्वप्ने पाहतात, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द बाळगतात आणि इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही करून दाखवण्याचे धाडस ठेवतात. लडाखचे उंच पर्वत आणि तिथले वेगळे वातावरण यांपासून प्रेरणा घेऊन या घड्याळांचे आधुनिक डिझाईन तयार केले गेले आहे. चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या आणि नेहमी पुढे जाण्याची इच्छा ठेवणाऱ्या नव्या पिढीसाठी, पर्वतांची अथांगता आणि त्यांचे वेगळेपण या घड्याळांमधून मांडण्यात आले आहे.

 

टायटन कंपनी लिमिटेडच्या 'सोनाटा'चे ब्रँड हेड, पुलक नारायण म्हणाले, “सोनाटा ब्रँडने डिझाईनच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकत अधिक प्रीमियम श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. आमचे नवीन 'समिट' कलेक्शन एका दमदार संकल्पनेची आणि आधुनिक डिझाईन्सची अशी सांगड घालते, जी ग्राहकांना खूप आवडेल. काहीतरी नवीन आणि वेगळे करून दाखवण्याची जी जिद्द नेहमीच आमच्या ब्रँडचा केंद्रबिंदू राहिला आहे, त्यालाच हे कलेक्शन अतिशय अनोख्या डिझाइन्समधून पुढे नेते. या कलेक्शनद्वारे आम्ही परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम डिझाईन्स हवी असणाऱ्या ग्राहकांमध्ये सोनाटाची लोकप्रियता आणखी मजबूत करत आहोत. नवे कलेक्शन आमच्या ब्रँडसाठी एक नवा अध्याय सुरू करत असून, यामध्ये ग्राहकांना सोनाटाचा एक नवा आणि वेगळा अनुभव मिळेल.”

 

लडाखच्या डोंगररांगांवर पडणारे सोनेरी ऊन, तिथली उंचच उंच बर्फाच्छादित शिखरे, बौद्ध मठांमधील शांतता, खडतर तपकिरी वाळवंट, सोनेरी वाळूच्या टेकड्या, विस्तीर्ण पसरलेले निळे आकाश आणि सूर्यास्तानंतर चमकणारे हिमनद या सर्व गोष्टी या घड्याळांमध्ये चपखलपणे उतरवण्यात आल्या आहेत. प्रत्येक घड्याळ लडाखचे एक वेगळे रूप दाखवते. हे कलेक्शन दर्शवते की, आजच्या तरुणाईची जिद्द आव्हानांनी भरलेल्या लडाखच्या निसर्गाप्रमाणेच आहे, जिथे प्रत्येक चढाईसाठी प्रचंड हिंमत लागते आणि प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन शोधण्यासाठी सुरू होतो. 'समिट'च्या माध्यमातून सोनाटा अशा पिढीशी जोडला जात आहे, ज्यांच्या मनात मोठी स्वप्ने आणि कधीही न थांबणारी महत्त्वाकांक्षा आहे; जे स्वतःची नवीन वाट निर्माण करण्याचे धाडस ठेवतात आणि प्रत्येक पावलावर 'वॉच आऊट फॉर अस' हा आत्मविश्वास दाखवून देतात, हीच सोनाटाची नवी ओळख आहे.

 

आधुनिक स्टाईल आणि अनोखी संकल्पना यांची सांगड असलेल्या या कलेक्शनमधील घड्याळे प्रत्येक प्रसंगाला साजेशी ठरतील अशी आहेत. रोजच्या वापरापासून ते कोणत्याही खास किंवा मोठ्या समारंभासाठी अगदी सहजपणे वापरता येतील.

 

सोनाटाच्या 'समिट' कलेक्शनमधील घड्याळांच्या किमती ४,५०० ते ५,५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सर्व सोनाटा स्टोअर्स, अधिकृत रिटेल आऊटलेट्स आणि आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तसेच www.sonatawatches.in या वेबसाईटवरून ऑनलाईन देखील ती खरेदी करता येतील. 


Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*