प्रा.सौ.रंजना शिरीष चव्हाण यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची पीएच. डी.पदवी प्रदान....

प्रा.सौ.रंजना शिरीष चव्हाण यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची पीएच. डी.पदवी प्रदान....
पुणे –
येथील यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख सौ. रंजना शिरीष चव्हाण यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे नुकतीच पीच. डी. पदवी प्रदान केली. त्यांनी पायरिथ्रॉइड गटातील काही कीटकनाशकांच्या नैसर्गिक प्रोबायोटिक जीवाणूंकडून होणाऱ्या जैवविघटन प्रक्रियेवर अभ्यास करून विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. यासाठी त्यांना सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गजानन माळी यांचे मार्गदर्शन लाभले. 
फळे, भाज्या, फळभाज्या तसेच इतर पिकांच्या संरक्षणासाठी पायरिथ्रॉइड गटातील कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरली जातात. परंतु निसर्गातील जीवसृष्टीवर याचा घातक परिणाम होतो. अशा कीटकनाशकांचा काही अंश अन्न पदार्थांत आणि परिणामी मनुष्य व इतर प्राण्यांच्या शरीरात सुद्धा येतो. सौ. चव्हाण यांच्या संशोधनातून प्रोबायोटिक्स या मानवी आरोग्यास उपयुक्त असणाऱ्या नैसर्गिक जीवाणूंकडून या कीटकनाशकांचे जैव विघटन होते आणि त्याचे घातक परिणाम कमी होतात असे दिसून आले आहे. त्यामुळे असे प्रोबायोटिक जिवाणू जमिनीतील तसेच अन्न व अन्नपदार्थातील कीटकनाशकांचा अंश आणि घातक परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. या निष्कर्षामुळे डॉ. चव्हाण यांचे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे. 
त्यांच्या यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, सहकार्यवाह डॉ.के.डी.जाधव तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, उप-प्राचार्य डॉ.एस.एस.पाटील, विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एलानबंग सिंग आणि इतर पदाधिकारी व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*