हरियाणा, छत्तीसगडची उपांत्य फेरीत दणदणीत धडकहॉकी झारखंड, मध्य प्रदेशही उपांत्य फेरीत
हरियाणा, छत्तीसगडची उपांत्य फेरीत दणदणीत धडक
हॉकी झारखंड, मध्य प्रदेशही उपांत्य फेरीत
पुणे, २० ऑगस्ट: १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये हॉकी झारखंड, हॉकी मध्य प्रदेश, हॉकी हरियाणा आणि छत्तीसगड हॉकी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये चारही संघांनी दमदार कामगिरी केली.
हॉकी महाराष्ट्राच्या आयोजनाखाली आणि हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशावर शूटआऊटमध्ये ४-३ अशी मात केली. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिला. चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी मध्य प्रदेशने मणिपूर हॉकीचा ३-१ असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी चंदीगडवर ३-१ अशी मात केली, तर तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात छत्तीसगड हॉकीने उत्तर प्रदेश हॉकीचा ५-२ असा पराभव केला.
शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात हॉकी झारखंडचा सामना हॉकी मध्य प्रदेशशी, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात हॉकी हरियाणाची गाठ छत्तीसगड हॉकीशी पडणार आहे.
ही अजिंक्यपद स्पर्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने हॉकी महाराष्ट्रातर्फे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक ही प्रस्तुत प्रायोजक असून युनियन बँक ऑफ इंडिया पॉवरिंग पार्टनर आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स अधिकृत भागीदार, बिसलेरी हायड्रेशन पार्टनर, तर अस्वानी असोसिएट्स आणि सुहाना मसाला हे सपोर्ट पार्टनर्स आहेत.
पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशावर शूटआऊटमध्ये विजय मिळवला. ओडिशाकडून लुगान अंजुलता (२४वे मिनिट) हिने गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हॉकी झारखंडच्या राजणी केरकेट्टा (३३वे मिनिट) हिने गोल करत सामना बरोबरीत आणला.
शूटआऊटमध्ये हॉकी झारखंडकडून सलोमी नाग, अनुप्रिया सोरेंग, डुंगडुंग स्विती आणि राजणी केरकेट्टा यांनी गोल केले. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाकडून द्रुपती नाईक, आमद आशिका आणि अजिता एक्का यांनी गोल नोंदवले.
हॉकी झारखंडची जमुना कुमारी, तर ओडिशाची अटलाया लकडा आणि भोई डोली यांना शूटआऊटमध्ये गोल करण्यात प्रयत्न निष्फळ ठरला.
यानंतर झालेल्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी मध्य प्रदेशने मणिपूर हॉकीचे आव्हान ३-१ असे संपुष्टात आणले. मध्य प्रदेशकडून काजलने (२५वे, ४३वे मिनिट) दोन गोल करत शानदार कामगिरी केली. यातील पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवरून, तर दुसरा मैदानी गोल होता. तन्वी (३७वे मिनिट) हिने पेनल्टी कॉर्नरवरून आणखी एक गोल करत मध्य प्रदेशची आघाडी भक्कम केली. मणिपूरकडून चानू रोमिता वारिबाम (४४वे मिनिट) हिने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत पिछाडी कमी केली.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी चंदीगडला ३-१ असे पराभूत केले. दुर्गा (१४वे मिनिट), दीक्षा (१९वे मिनिट) आणि सुखप्रीत कौर (५९वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत हरियाणाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. हॉकी चंदीगडकडून अप्राम (३९वे मिनिट) हिने एकमेव गोल नोंदवला.
तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात छत्तीसगड हॉकीने उत्तर प्रदेश हॉकीवर ५-२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. विजेत्या संघाकडून यशोदा (९वे, ३७वे मिनिट), रुखमणी (१९वे मिनिट), अंजली एक्का (२४वे मिनिट) आणि यादव शीतल (४४वे मिनिट) यांनी गोल केले. उत्तर प्रदेश हॉकीकडून शंकर पायल (२२वे मिनिट) आणि अन्नू (३३वे मिनिट) यांनी गोल नोंदवले.
निकाल – उपांत्यपूर्व फेरी
उपांत्यपूर्व सामना १:
हॉकी झारखंड: १ (४) — राजणी केरकेट्टा (३३वे मिनिट); सलोमी नाग, अनुप्रिया सोरेंग, डुंगडुंग स्विती, राजणी केरकेट्टा वि. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा: १ (३) — लुगान अंजुलता (२४वे मिनिट); द्रुपती नाईक, आमद आशिका, अजिता एक्का; मध्यंतर: ०-१
उपांत्यपूर्व सामना ४:
हॉकी मध्य प्रदेश: ३ — काजल (२५वे, ४३वे मिनिट), तन्वी (३७वे मिनिट) वि. मणिपूर हॉकी: १ — चानू रोमिता वारिबाम (४४वे मिनिट); मध्यंतर: १-०
उपांत्यपूर्व सामना २:
हॉकी हरियाणा: ३ — दुर्गा (१४वे मिनिट), दीक्षा (१९वे मिनिट), सुखप्रीत कौर (५९वे मिनिट)
वि. हॉकी चंदीगड: १ — अप्राम (३९वे मिनिट); मध्यांतर: २-०
उपांत्यपूर्व सामना ३:
Comments
Post a Comment