अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या नर्हे कॅम्पसमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

*अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या नर्हे कॅम्पसमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या नर्हे कॅम्पसमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधवराव सानप (निवृत्त आयजीपी) उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष राजीव जगताप , उपाध्यक्ष संजीव जगताप , सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप,खजिनदार ध्रुव जगताप, सदस्य आणि समन्वयक डॉ. सविता शिंदे , माजी उपसभापती प्रभावती भुमकर ग्रामपंचायत सदस्या सुरेखा पवार, समाजसेवक जोगदंड सर यांची विशेष उपस्थिती होती.
अभिनव च्या नऱ्हे कॅम्पसमधील सर्व महाविद्यालये व शाळांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रगीताच्या सन्मानाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*