मेरीटॉन टॉवर" सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.**सोसायटीतील नूतन कमिटीच्या पहिल्याच देशभक्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले "मेरीटॉन" कुटुंब.*

*"मेरीटॉन टॉवर" सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*

*सोसायटीतील नूतन कमिटीच्या पहिल्याच देशभक्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले "मेरीटॉन" कुटुंब.*

आंबेगाव पठार येथील "मेरीटॉन"सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक आप्पा रेणुसे , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी, सामाजिक कार्यकर्ते विराज रेणुसे, विलास भणगे सोसायटीचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर झेंडावंदन करून करण्यात आली.आप्पा रेणुसे म्हणाले की,"भारतामध्ये एकत्रीकरणाची गरज व्यक्त करून प्रत्येकाने सामाजिक सलोखा जपला पाहिजे ,त्याचबरोबर माणसाने माणसासारखे वागून देशाप्रती ऋण व्यक्त केले पाहिजे. असे प्रतिपादन केले,यावेळी देशभक्तीपर कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम सोसायटीमध्ये नेहमी साजरे करण्यासाठी आवाहन केले.स्वातंत्र्य दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीचे सर्व वॉचमन, आणि सफाई कामगारांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम सोसायटीच्या नवीन कमिटी मधील सर्व सभासद आणि सोसायटी मधील इतर सर्व सभासदांच्या बहुमूल्य सहकार्याने पार पडला. 
 

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*