लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पुण्यात ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रम.



 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पुण्यात ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रम.

 

     ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बैजुजी, मनोज त्यागी, महिला अध्यक्षा संध्या सव्‍वालाखे, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, येशामती ठाकुर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, बाबु नायर, सुनिल मलके, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाचे अध्यक्ष दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष लहुअण्णा निंवगुणे, गटनेते चंदूशेठ कदम व पदाधिकार, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     बैठकीचे प्रास्ताविक पश्चिम विभागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी यांनी केले. यानंतर पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यक्रमासंदर्भात सूचना मांडल्या.

     यानंतर कार्यक्रमाचे स्वरूप सांगताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘‘पुण्यात पहिल्यांदाच महिला विद्यार्थींनींशी सवांद लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुली गांधी करणार आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असून संपूर्ण देशातून विद्यार्थी विविध महाविद्यालय व विद्यापीठात शिक्षण घ्यायला येतात. विद्यार्थ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आंदोलन करतात. नीट पेपरफूटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्याचा मुख्य केंद्रबिंदू पुण्यात होता. राहुलजी गांधी महिला विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेवून त्यांना त्यांच्या भवितव्‍यासाठी जो विषय महत्वाचा असेल ते सरकार पुढे मांडत आहे. त्यांनी अनेक ठिकाणी ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बाबत आपले विचार मांडले आहेत. सर्व काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, फ्रंटल संघटना, सेल, व कार्यकर्त्यांनी एकजूटीने काम करून राहुल गांधी यांचा ‘छात्रो की गुंज’ हा कार्यक्रम यशस्वी करावा.’’

     उपस्थित पुणे शहरातील काँग्रेस नेते, पदाधिकारी, नगरसेवक यांनी कार्यक्रम यशस्वी व्‍हावा म्हणून आपापल्या सूचना मांडल्या. 


Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*