अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाकडून अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी इंडेक्स फंड आणि अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी ईटीएफ एनएफओचे लाँच; भारतातील विकसित होणाऱ्या भांडवली ऊर्जा परिसंस्थेत गुंतवणूकीची संधी




 

 

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाकडून अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी इंडेक्स फंड आणि अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी ईटीएफ एनएफओचे लाँच; भारतातील विकसित होणाऱ्या भांडवली ऊर्जा परिसंस्थेत गुंतवणूकीची संधी

 

अ‍ॅक्सिस निफ्टी इंडेक्स फंडाची प्रमुख वैशिष्ट्ये:

प्रकार: निफ्टी एनर्जी टीआरआयचे अनुकरण/ट्रॅकिंग करणारी ओपन-एंडेड योजना
बेंचमार्क: निफ्टी एनर्जी टीआरआय
न्यू फंड ऑफर (एनएफओ) कालावधी: ७ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६
फंड मॅनेजर्स: नंदीक मल्लिका, रोहित गौतम
किमान अर्ज रक्कम: १०० रूपये आणि त्यानंतर १ रूपयाच्या पटीत
एक्झिट लोड: वाटपाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत रिडीम/स्विच आउट केल्यास ०.२५ टक्‍के; त्यानंतर शून्य
अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी ईटीएफची प्रमुख वैशिष्ट्ये:

प्रकार: निफ्टी एनर्जी टीआरआयचे अनुकरण/ट्रॅकिंग करणारी ओपन-एंडेड योजना
बेंचमार्क: निफ्टी एनर्जी टीआरआय
ट्रेडिंग सिम्बॉल: ENERGYAXIS
न्यू फंड ऑफर (एनएफओ) कालावधी: १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६
फंड मॅनेजर्स: नंदीक मल्लिका आणि रोहित गौतम
किमान अर्ज रक्कम: ५,००० रूपये आणि त्यानंतर १० रूपयांच्या पटीत
एक्झिट लोड: शून्य
 

मुंबई, १० ऑगस्ट २०२६: अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड या भारतातील अग्रगण्य असेट मॅनेजमेंट कंपनीने अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी इंडेक्स फंड आणि अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी ईटीएफच्या लाँचची घोषणा केली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या ऊर्जा परिसंस्थेत भाग घेण्याचा एक सोपा आणि पारदर्शक मार्ग उपलब्ध झाला आहे. इंडेक्स श्रेणीतील पहिल्या फंडांपैकी एक असलेला अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी इंडेक्स फंड ७ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला आहे आणि २१ ऑगस्ट २०२६ रोजी बंद होईल. तर अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी ईटीएफ १२ ऑगस्ट २०२६ रोजी उघडेल आणि २१ ऑगस्ट २०२६ रोजी बंद होईल. हा ईटीएफ स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केला जाईल. दोन्ही योजनांचे उद्दिष्ट, ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन राहून खर्चापूर्वी निफ्टी एनर्जी टीआरआयच्या कामगिरीशी सुसंगत परतावा प्रदान करणे हे आहे.

भारताच्या पुढील दशकातील वाढीला ऊर्जा देणारे क्षेत्र

भारताची ऊर्जा क्षेत्रातील गाथा अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. भारतातील दरडोई वीज वापर अनेक विकसित आणि उगवत्या अर्थव्यवस्थांपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे, ज्यामुळे दीर्घकालीन मागणी वाढीची मोठी शक्यता अधोरेखित होते. त्याच वेळी, देश पारंपारिक ऊर्जा स्रोत, नूतनीकरणक्षम ऊर्जा, वीज निर्मिती, ट्रान्समिशन पायाभूत सुविधा, ऊर्जा उपकरणे आणि नवीन तंत्रज्ञानापर्यंत संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीमध्ये व्यापक बदल अनुभवत आहे.

भविष्यकालीन मागणी पूर्ण करण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमधून या संधीची व्याप्ती दिसून येते. भारताने आपल्या संपूर्ण इतिहासात आतापर्यंत जेवढी क्षमता जोडली आहे, त्याहून अधिक म्हणजेच पुढील दशकात ५८० गिगावॅटपेक्षा जास्त वीज निर्मिती क्षमता जोडण्याचा अंदाज आहे. या विस्तारात नूतनीकरणक्षम ऊर्जेचा मोठा वाटा असेल, तर दुसरीकडे ट्रान्समिशन नेटवर्क, साठवणूक सोल्यूशन्स, नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा आणि ग्रिड आधुनिकतेमधील गुंतवणुकीला गती मिळत राहील.

अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी इंडेक्स फंड आणि अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी ईटीएफ

अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी इंडेक्स फंड आणि अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी ईटीएफ हे निफ्टी एनर्जी टीआरआयचे अनुकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवतात; जे गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील वाढीच्या कथेत भाग घेण्याचा एक सोपा आणि किफायतशीर मार्ग प्रदान करतात. हे फंड ऑईल अँड गॅस (तेल व वायू), वीज निर्मिती, ट्रान्समिशन व डिस्ट्रिब्युशन, नूतनीकरणक्षम ऊर्जा, ऊर्जा उपकरणे आणि संबंधित पायाभूत सुविधांसह संपूर्ण ऊर्जा व्हॅल्यू चेनमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूकीची संधी देतात.

या लाँचबाबत मत व्यक्त करत अ‍ॅक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ बी. गोपकुमार म्हणाले, "ऊर्जा हा आर्थिक प्रगतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण पाया आहे. भारत जसा उच्च पातळीवरील औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि डिजिटायझेशनच्या दिशेने वाटचाल करत आहे, तशी संपूर्ण ऊर्जा परिसंस्थेतील मागणी लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, हे क्षेत्र नूतनीकरणक्षम ऊर्जेचा स्वीकार, ट्रान्समिशन विस्तार, ऊर्जा सुरक्षा उपक्रम आणि तांत्रिक नवोन्मेषामुळे संरचनात्मक बदलांमधून जात आहे."

ते पुढे म्हणाले: "पारंपारिक ऊर्जा, नूतनीकरणक्षम ऊर्जा, ट्रान्समिशन पायाभूत सुविधा, युटिलिटीज आणि ऊर्जेशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतवणूकीची संधी देत, अ‍ॅक्सिस निफ्टी एनर्जी इंडेक्स फंड आणि अ‍ॅक्सिस निफ्टी


Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*