तिसरी ‘हे-बॉल जागतिक अजिंक्यपद‌’ स्पर्धा !!शिवम अरोरा, पंकज अडवानी, लक्ष्मण रावत, कमल चावला, दिव्य शर्मा, नताशा चेतन, विद्या पिल्लई, अनुपमा रामचंद्रन, गिआना रेगो यांची आगेकूच !!


तिसरी ‘हे-बॉल जागतिक अजिंक्यपद‌’ स्पर्धा !!

शिवम अरोरा, पंकज अडवानी, लक्ष्मण रावत, कमल चावला, दिव्य शर्मा, नताशा चेतन, विद्या पिल्लई, अनुपमा रामचंद्रन, गिआना रेगो यांची आगेकूच !!

पुणे १३ ऑगस्टः बिलीयर्डस्‌ अँड स्नुकर फेडरेशन ऑफ इंडिया (बीएसएफआय) आणि अपेक्स्‌ स्पोर्ट्‌स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या ‘डब्ल्युपीए हे-बॉल जागतिक अजिंक्यपद‌’ स्पर्धेत पुण्याचा शिवम अरोरा, पंकज अडवानी, लक्ष्मण रावत, कमल चावला, दिव्य शर्मा यांच्यासह नताशा चेतन, विद्या पिल्लई, अनुपमा रामचंद्रन आणि पुण्याच्या गिआना रेगो यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर पराभव करून आगेकूच केली.

कोंढवा येथील ‘जयराज स्पोर्ट्‌स अँड कन्व्हेन्शन सेंटर‌’मधील ‘राजन खिंवसरा बिलीयर्डस अँड स्नुकर अकादमी‌’ येथे स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालेल्या खेळाडूंना ‘लुझर ब्रॅकेट‌’ या फेरीमध्ये लढावे लागते. ‘लुझर ब्रॅकेट‌’च्या पहिल्या फेरीत स्विडनच्या केविन झारेकानी याने पुण्याच्या आणि १५ वर्षीय युवा खेळाडू आरव संचेती याचा ७-५ असा पराभव केला. अपेक्स स्पोर्ट्‌सचे संस्थापक आणि सीईओ तसेच स्पर्धेत खेळाडू म्हणून थेट सहभागी झालेला पुण्याच्या शिवम अरोरा याने भारताच्या अभिनव धीमन याचा ७-० असा सहज पराभव केला.

बिलियर्ड्‌स आणि स्नुकरमधील २८ वेळा जागतिक विजेतेपद पटकावलेला आंतरराष्ट्रीय खेळाडू पंकज अडवाणी याने पोलंडच्या मायकेल टर्कोव्स्की याचा ७-३ असा पराभव केला. काल झालेल्या पहिल्या फेरीमध्ये पंकज अडवानी याला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताच्या कमल चावला याने उझेर खान याचा ७-१ असा पराभव केला. दिव्य शर्मा याने अयुब बख्याऊई याचा ६-५ असा पराभव करून आगेकूच केली. लक्ष्मण रावत याने रणवीर दुग्गल याचा ६-३ असा पराभव केला. स्नेझो गुमेडे या दक्षिण आफ्रिकाच्या खेळाडूने भारताच्या संदीप गुलाटी याचा ६-५ असा पराभव केला.

महिलांच्या गटामध्ये ‘वर्ल्ड ज्युनियर‌’ स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी भारताच्या नताशा चेतन हिने ऑस्ट्रलियाच्या लेअन्ने हास हिचा ६-१ असा पराभव केला. कॉमनवेल्थ बिलियर्ड्‌स चॅम्पियनशीप‌’मध्ये सुवर्णपदक जिंकणारी विद्या पिल्लई हिने जपानच्या तमामी ओकुडा हिचा ४-३ असा पराभव केला. आयबीएसएफ जागतिक स्नुकर विजेती अनुपमा रामचंद्रन हिने भारताच्या जिया सेहगल हिचा ६-३ असा पराभव केला. पुण्याच्या गिआना रेगो हिने झिंम्बाब्बेच्या निकीफोरोस रोबयन हिचा ६-१ असा सहज पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या लिली मेलड्रम हिने भारताच्या सी. पद्माक्क्षे हिचा ५-२ असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा निकालः पुरूष गटः ‘लुझर ब्रॅकेट‌’ पहिली फेरीः
केविन झारेकानी (स्विडन) वि.वि. आरव संचेती (भारत) ७-५;
दिव्य शर्मा (भारत) वि.वि. अयुब बख्याऊई (मलेशिया) ६-५;
लक्ष्मण रावत (भारत) वि.वि. रणवीर दुग्गल (भारत) ६-३;
शिवम अरोरा (भारत) वि.वि. अभिनव धीमन (भारत) ७-०;
पंकज अडवाणी (भारत) वि.वि. मायकेल टर्कोव्स्की (पोलंड) ७-३;
कमल चावला (भारत) वि.वि. उझेर खान (भारत) ७-१;
स्नेझो गुमेडे (दक्षिण आफ्रिका) वि.वि. संदीप गुलाटी (भारत) ६-५;

महिला गटः ‘लुझर ब्रॅकेट‌’ पहिली फेरीः
गिआना रेगो (भारत) वि.वि. निकीफोरोस रोबयन (झिंम्बाब्बे) ६-१;
अनुपमा रामचंद्रन (भारत) वि.वि. जिया सेहगल (भारत) ६-३
लिली मेलड्रम (ऑस्ट्रेलिया) वि.वि. सी. पद्माक्क्षे (भारत) ५-२;
विद्या पिल्लई (भारत) वि.वि. तमामी ओकुडा (जपान) ४-३;
नताशा चेतन (भारत) वि.वि. लेअन्ने हास (ऑस्ट्रेलिया) ६-१.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*