चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले, तनय इंगवले यांचे विजय
चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले, तनय इंगवले यांचे विजय
पुणे, 27 ऑगस्ट 2026: सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले, तनय इंगवले यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
प्रभात रोड येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर येथील टेबल टेनिस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित आहाना गोडबोले याने तिसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनचा 11-5,12-10,6-11,11-7 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अव्वल मानांकित दिया शिंदेने डायना पटेलचा 11-6,11-6,11-6 असा तर चौथ्या मानांकित अनन्या पाटीलने पाचव्या मानांकित स्पृहा गुजरचा 11-3,11-5,8-11,9-11,11-7 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित तनय इंगवले याने दुसऱ्या मानांकित पुष्कर चक्रदेवचा 11-7,11-5,10-12,11-8 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित आर्यन वानखेडेने साहिल भोरकरवर 11-4,11-7,11-3 असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित नभ पांचोलियाने मिथिल ठक्करला 11-6,11-8,11-6 असे पराभूत केले.
निकाल: 15 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
दिया शिंदे[1]वि.वि.डायना पटेल 11-6,11-6,11-6;
अनन्या पाटील[4] वि.वि.स्पृहा गुजर[5] 11-3,11-5,8-11,9-11,11-7;
आहाना गोडबोले[6] वि.वि.शरण्या पटवर्धन[3]11-5,12-10,6-11,11-7;
नीरजा देशमुख[2] वि.वि.श्रेया कोठारी 11-5,4-11,11-3,11-8;
15 वर्षांखालील मुले: उप उपांत्यपूर्व फेरी:
आर्यन वानखेडे [1] वि.वि.साहिल भोरकर 11-4,11-7,11-3;
एल्विस टॉम[8] वि.वि.अंगद भार्गवे 12-10,11-9,11-5;
वरदान कोलते[5] वि.वि.साद वकील 11-7,11-9,11-5;
नभ पांचोलिया[4] वि.वि.मिथिल ठक्कर 11-6,11-8,11-6;
ऋग्वेद दांडेकर[3] वि.वि.सर्वेश जोशी 8-11,6-11,12-10,11-8,11-6;
नीरज नांदेडे वि.वि.आदम रामपूरवाला 11-8,15-13,11-7;
वरद माळवदकर[7] वि.वि.ओंकार अभ्यंकर 9-11,11-8,11-6,11-6;
तनय इंगवले वि.वि.पुष्कर चक्रदेव[2] 11-7,11-5,10-12,11-8
Comments
Post a Comment