ड्रिव्हनने ने टाटा मोटर्ससोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली, इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्ससाठी नाविन्यपूर्ण लीझिंग आणि फायनान्सिंग सोल्यूशन्स सादर करणार


ड्रिव्हनने ने टाटा मोटर्ससोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली, इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्ससाठी नाविन्यपूर्ण लीझिंग आणि फायनान्सिंग सोल्यूशन्स सादर करणार

हा सहयोग कमर्शियल ताफ्यांमध्ये ईव्हीचा वापर वाढवण्यासाठी सानुकूलित लीझिंग पर्याय उपलब्ध करेल

मुंबई, २० ऑगस्ट २०२६: ड्रिव्हन या हेवी कमर्शियल वाहनांच्या ताफ्यासाठी काम करणाऱ्या ईव्ही लीझिंग प्लॅटफॉर्मने भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या कराराचा उद्देश भारतातील फ्लिट ऑपरेटर्ससाठी लीझिंग-आधारित इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या तैनातीचा शोध घेणे हा आहे. या सहयोगांतर्गत, ड्रिव्हन टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओसाठी सानुकूलित लीझिंग पर्याय प्रदान करेल, ज्यामुळे सोप्या आणि सानुकूलित फायनान्सिंग सोल्यूशन्सद्वारे फ्लिट ऑपरेटर्सना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे सुलभ होईल.

ड्रिव्हन कमर्शियल फ्लिट ऑपरेटर्सच्या गरजांनुसार तयार केलेले ऑपरेटिंग लीझ पर्याय ऑफर करते. फायनान्सिंग, वाहनांची तैनाती आणि चार्जिंग पायाभूत सुविधांमधील दीर्घकालीन त्रुटी दूर करून हे प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारा बदल अधिक सोपा व व्यावहारिक बनवत आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतात फ्लिटच्या इलेक्ट्रिककरणाला वेग मिळत आहे.

टाटा मोटर्स सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ आणि इलेक्ट्रिककरणाला व्यावहारिक व फायदेशीर बनवणाऱ्या परिसंस्थेसह कमर्शियल मोबिलिटीच्या या बदलाचे नेतृत्व करत आहे. कंपनी वाहनांच्या संपूर्ण कार्यकाळात कामगिरी, अपटाईम, चार्जिंग आणि फायनान्सिंगचा समतोल साधण्यासाठी फ्लिट मालकांसोबत मिळून काम करते. ईव्हीचा स्वीकार वाढत आहे, तसतसे ग्राहकांना शून्य-उत्सर्जन गतीशीलतेकडे आत्मविश्वासाने वळण्यास मदत करण्यासाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्स प्रदान करण्यावर टाटा मोटर्सचा भर कायम आहे.

या प्रसंगी मत व्यक्त करत टाटा मोटर्स लि. चे व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड - ट्रक्स, श्री. राजेश कौल म्हणाले, "टाटा मोटर्स स्वच्छ गतीशीलतेचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने भारताचा प्रवास वेगाने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ड्राइव्हनसोबत सहयोगाने आमच्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक ट्रक्स अधिक सुलभ बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा इलेक्ट्रिक ट्रक्सचा पोर्टफोलिओ कामगिरी, विश्वासार्हता आणि आर्थिक कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करतो आणि त्यांना शून्य-उत्सर्जन तंत्रज्ञानाकडे आत्मविश्वासाने वळण्यास मदत करतो."

ड्रिव्हनचे सीईओ आणि सह-संस्थापक मानव बंसल म्हणाले, "व्यावसायिक दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा फायदेशीर बनवणे हे मोठ्या प्रमाणावर ईव्हीचा अवलंब करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. फ्लिट ऑपरेटर्सकडून याबद्दल स्वारस्य वाढत असले तरी हा बदल अंतिमतः हे पर्याय किती व्यावहारिक आणि सुलभ आहेत, यावर अवलंबून आहे. टाटा मोटर्ससोबत सहयोगामुळे आम्हाला त्यांच्या प्रबळ वाहन पोर्टफोलिओची सांगड आमच्या लीझिंग मॉडेलशी घालता येत आहे, ज्यामुळे सुरुवातीचा खर्च आणि तैनातीचा वेळ यांसारख्या मुख्य अडचणी दूर होत आहेत. या सहयोगाद्वारे आमचा पुढील दोन वर्षांत १,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक ट्रक्स तैनात करण्याचा मनसुबा आहे. यामुळे फ्लिट ऑपरेटर्सना ईव्हीकडे वळण्याचा स्पष्ट व विस्तारयोग्य मार्ग मिळेल, तसेच भारतातील ईव्ही परिसंस्थेच्या व्यापक वाढीस मदत होईल."

ड्रिव्हनच्या सह-संस्थापिका आणि चीफ बिझनेस ऑफिसर अल्पना जैन म्हणाल्या, "समर्थनासाठी योग्य परिसंस्था एकत्र येते, तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. टाटा मोटर्सच्या बाजारपेठेतील प्रबळ उपस्थितीमुळे फ्लिट ऑपरेटर्सचा विश्वास आणि पोहोच वाढते, कारण ओईएमकडून आम्हाला वाहनांची निगा राखणे आणि अपटाईमची संयुक्त बांधिलकी मिळत आहे, तसेच कार्यक्षमता तपासण्यासाठी तंत्रज्ञानाची सांगड घातली जात आहे."

टाटा मोटर्स आपल्या प्रबळ पोर्टफोलिओसह देशाच्या इलेक्ट्रिक व्यावयासिक वाहन बदलाचे नेतृत्व करत आहे. कंपनीने टाटा Trucks.ev ब्रँड अंतर्गत नवीन आय-एमओईव्ही (इंटेलिजेंट मॉड्युलर इलेक्ट्रिक वेईकल) आर्किटेक्चरवर आधारित ७ ते ५५ टनांपर्यंतच्या इलेक्ट्रिक ट्रक्सचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ नव्याने सादर केला आहे. शाश्वत, कार्यक्षम आणि उच्च-कार्यक्षम ऑपरेशन्ससाठी डिझाइन केलेले हे ट्रक्स ई-कॉमर्स लॉजिस्टिक, बांधकाम साहित्य वाहतूक आणि पोर्ट ऑपरेशन्ससह अनेक क्षेत्रांतील गरजा पूर्ण करतात. वेगाने वाढणाऱ्या ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा आणि देशभरातील सर्व्हिस नेटवर्कच्या पाठिंब्याने टाटा मोटर्स शाश्वत गतीशीलतेला पुढे नेण्यासाठी आणि भारतातील हरित वाहतूक परिसंस्था अधिक दृढ करण्यासाठी आपल्या कटिबद्धतेशी बांधील आहे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*