ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड तर्फे रेडिओ मिर्चीच्या सहकार्याने ‘ह्युंदाई ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्स’ सादर


ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड तर्फे रेडिओ मिर्चीच्या सहकार्याने ‘ह्युंदाई ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्स’ सादर


पुणे, १७ ऑगस्ट २०२६ :ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने रेडिओ मिर्चीच्या सहकार्याने आज ‘ह्युंदाई ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्स’ (टीक्यूआय) सादर करण्याची घोषणा केली. ही एकात्मिक आणि रिअल-टाइम वाहतूक रेटिंग प्रणाली विकसित करण्यात आली असून याद्वारे शहरी वाहतुकीची स्थिती समजून घेणे आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करणे प्रवाशांना अधिक सोपे जाणार आहे.देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू,चेन्नई, हैदराबाद, पुणे आणि कोलकाता या सात प्रमुख शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना वाहतुकीसंदर्भातील उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि कार्यक्षम प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

ह्युंदाई ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्समध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली, प्रमाणित आणि समजण्यास सोपी ट्रॅफिक रेटिंग प्रणाली सादर करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे वाहतुकीशी संबंधित गुंतागुंतीची माहिती सोप्या आणि सर्वांना सहज समजणाऱ्या रंग-संकेतांवर आधारित रेटिंगमध्ये केली जाते. लाइव्ह ट्राफिक डेटा , प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती आणि अधिकृत वाहतूक प्राधिकरणांकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचा एकत्रित वापर करून ह्युंदाई टीक्यूआय प्रवाशांना आपल्या प्रवासाचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास, वाहतूक कोंडीचा अंदाज घेण्यास आणि प्रवास सुरू करण्यापूर्वी तसेच प्रवासादरम्यान अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम बनवते.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*