अनन्या बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र मायक्रोफिन तर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर



 

अनन्या बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र मायक्रोफिन तर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

 

डीआरएचपी लिंक:

https://www.axiscapital.co.in/contents/Svatantra%20Microfin%20Limited%20%20-%20DRHP-1786646535.pdf

 

अनन्या बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र मायक्रोफिन लिमिटेड ही सर्वसमावेशनावर लक्ष केंद्रित करणारी बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी असून भारतीय अर्थव्यवस्थेतील कुटुंबांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देण्यासाठी तसेच तळागाळातील उद्योजकांना सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे. कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर केला आहे.

 

या आयपीओमध्ये 1,500 कोटी रु.चे फ्रेश इश्यू आणि 1,500 कोटी रु.ची ऑफर फॉर सेल यांचा समावेश असून, एकूण इश्यूचा आकार 3,000 कोटी रु. आहे.

 

फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनीचा टियर-I भांडवली आधार वाढवण्यासाठी केला जाणार आहे. व्यवसाय आणि मालमत्तेच्या वाढीमुळे तसेच विस्तारामुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातील भांडवली गरजांमध्ये पुढील कर्जवितरणाचाही समावेश आहे. ते पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे.

 

स्वतंत्र मायक्रोफिन लिमिटेड व्यक्ती आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देत आर्थिक समावेशनाला चालना देते. यामुळे त्यांचे जीवनमान अधिक सक्षम होण्यास तसेच विविध समुदायांच्या आर्थिक सहभागाला पाठबळ मिळण्यास मदत होते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने मायक्रोफायनान्स कर्जांचा समावेश असून, त्यासोबत सुरक्षित वित्तपुरवठा उत्पादनांचाही समावेश आहे. यामध्ये परवडणाऱ्या घरांसाठीचा वित्तपुरवठा, तसेच मालमत्तेच्या तारणावरील कर्जांचा समावेश असून ही उत्पादने तिची उपकंपनी स्वतंत्र मायक्रो हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत उपलब्ध करून दिली जातात.

 

स्वतंत्र मायक्रोफिन लिमिटेडचे नेतृत्व अध्यक्षा आणि बिगर-कार्यकारी संचालक अनन्या बिर्ला करीत आहेत. त्या आदित्य बिर्ला समूहाच्या परंपरेतील पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करतात. 2011 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने NBFC-MFI परवाना सुरू केल्यानंतर हा परवाना मिळवणारी स्वतंत्र मायक्रोफिन ही पहिली संस्था होती.

 

31 मार्च 2026, 2025 आणि 2024 रोजीच्या स्थितीनुसार, मायक्रोफायनान्स व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या (AUM - MFI) आधारे स्वतंत्र मायक्रोफिन लिमिटेड ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी – मायक्रोफायनान्स संस्था (“NBFC-MFI”) आहे. मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये स्वतंत्र मायक्रोफिन ही भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी NBFC-MFI ठरली आहे. समकक्ष संस्थांमध्ये तिचे AUM - MFI 31 मार्च 2024 रोजीच्या 144,378.72 दशलक्ष रु. वरून 31 मार्च 2026 रोजी 210,932.22 दशलक्ष रु. इतके झाले असून, या कालावधीत त्यात 20.87% चा CAGR नोंदवला गेला आहे. भारतातील एकूण AUM - MFI मधील कंपनीचा वाटा 31 मार्च 2024 रोजीच्या 3.26% वरून 31 मार्च 2026 रोजी 6.37% झाला आहे. यावरून आर्थिक चक्रांमधील कंपनीची स्थिर वाढ अधोरेखित होते. 31 मार्च 2026 रोजीच्या स्थितीनुसार, AUM - MFI च्या आधारे स्वतंत्र मायक्रोफिन ही बिहार आणि उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठी NBFC-MFI देखील आहे.

 

कंपनीच्या मायक्रोफायनान्स जोखीम व्यवस्थापन धोरणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणजे भौगोलिक विविधता. उदाहरणार्थ, 31 मार्च 2026, 2025 आणि 2024 रोजी कंपनीच्या AUM - MFI मध्ये कोणत्याही एका जिल्ह्याचा वाटा अनुक्रमे 2.74%, 2.60% आणि 2.35% पेक्षा अधिक नव्हता. त्याचप्रमाणे, याच तारखांना कोणत्याही एका राज्याचा कंपनीच्या AUM - MFI मधील वाटा अनुक्रमे 23.02%, 21.66% आणि 20.72% पेक्षा अधिक नव्हता. आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 मध्ये MFI समकक्ष संस्थांमध्ये स्वतंत्र मायक्रोफिन लिमिटेडने अनुक्रमे 2.24% आणि 1.19% इतका सर्वात कमी ग्रॉस स्टेज 3 रेशो नोंदवला. भौगोलिक विविधता, शिस्तबद्ध कर्जमूल्यांकन, कर्जदार-केंद्रित उत्पादनांची रचना आणि प्रभावी वसुली यंत्रणेमुळे कंपनीच्या कामगिरीला पाठबळ मिळाले आहे.

 

याशिवाय, चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेडचे स्वतंत्र मायक्रोफिन लिमिटेडमध्ये 21 मार्च 2026 पासून झालेले विलीनीकरण हे कंपनीच्या विद्यमान भौगोलिक पातळीवरील स्थानाला पूरक ठरले आहे. विशेषतः दक्षिण भारतात चैतन्यची आधीपासून असलेली मजबूत उपस्थिती यामुळे कंपनीचे संपूर्ण भारतातील स्थान आणखी बळकट झाले आहे. त्याचवेळी भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ कायम ठेवण्यात आला आहे.

 

MFI समकक्ष संस्थांच्या तुलनेत क्षेत्रीय तणावाच्या कालावधीतही स्वतंत्र मायक्रोफिन लिमिटेडने आपली लवचिकता कायम ठेवली आहे. आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 मध्ये कंपनीचा सरासरी AUM वरील परतावा (RoAAUM) MFI समकक्ष संस्थांमध्ये सर्वाधिक राहिला असून तो अनुक्रमे 2.90% आणि 3.57% होता. आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 या काळात, मायक्रोफायनान्स क्षेत्रात क्रेडीट कॉस्ट आणि मालमत्तेच्या गुणवत्तेवरील तणाव वाढलेला असतानाही, कंपनीने अनुक्रमे 13.66% आणि 15.00% इतका सर्वाधिक इक्विटीवरील परतावा (ROE) नोंदवला.

 

31 मार्च 2026 रोजीच्या स्थितीनुसार कंपनीच्या मायक्रोफायनान्स व्यवसायाला वैविध्यपूर्ण भौगोलिक विस्तार आणि जिल्हास्तरावरील सखोल पोहोच यांचा आधार

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*