आनंदना - द कोका-कोला इंडिया फाऊंडेशनच्या मैदान साफ उपक्रमांतर्गत पंढरपूर वारी 2026 मध्ये पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या सार्वजनिक सुविधांना सहकार्य
आनंदना - द कोका-कोला इंडिया फाऊंडेशनच्या मैदान साफ उपक्रमांतर्गत पंढरपूर वारी 2026 मध्ये पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या सार्वजनिक सुविधांना सहकार्य
पुणे,10 ऑगस्ट 2026 : पंढरपूर आषाढी वारी 2026 मध्ये आनंदना - द कोका-कोला इंडिया फाऊंडेशनने रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेल्या सार्वजनिक सुविधांना सहकार्य केले. ईकॉन्शियस,ईको डेको - द रिसायकल होम प्रा.लि., लक्ष्य आणि एचसीसीबी यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारीदरम्यान कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात आले आणि यामुळे वारकरी,स्वयंसेवक व स्थानिक प्रशासनाला मदत झाली. हा उपक्रम आनंदना - द कोका-कोला इंडिया फाऊंडेशनच्या मैदान साफ या प्रमुख मोहिमेचा एक भाग होता. ही मोहिम भारतभरातील मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांमध्ये जबाबदारीने व पध्दतशीर संकलन,वर्गीकरण आणि पुनर्वापर करण्यावर लक्ष केंद्रित करते.
अनेक दिवस दिंडीच्या माध्यमातून लाखो वारकरी प्रवास करत असताना,या उपक्रमाच्या माध्यमातून या मार्गावर अत्यावश्यक सार्वजनिक सुविधा व कचरा संकलन यंत्र
एचसीसीबीचे चीफ पब्लिक अफेअर्स अँड सस्टेनेबिलिटी ऑफिसर हिमांशू प्रियदर्शी म्हणाले, पंढरपूर वारीसारख्या सोहळ्यामधून मोठ्या प्रमाणावर नागरिक हे सामूहिक सहभाग घेत असतात.अशा सहभागातून पर्यावरणपूरक आणि जबाबदार सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची संधी असते. संकलित केलेल्या प्लास्टिकचे पुनर्वापर करून त्यापासून वारकऱ्यांच्या उपयोगासाठी योग्य सार्वजनिक सुविधा तयार करण्यात आल्या. अशा उपक्रमांमधून सामुदायिक कार्यक्रमांदरम्यान सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्याची क्षमता अधोरेखित होते.
ईकॉन्शियसचे सहसंस्थापक वैभव वर्मा म्हणाले की,या प्रकल्पावर एकत्रित काम करताना वारीदरम्यान वारकरी,स्वयंसेवक आणि अधिकारी वापरत असलेल्या जागांमध्ये प्रभावी कचरा व्यवस्थापन समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.दृश्यमान आणि कार्यात्मक पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे केवळ सार्वजनिक सोयीला आधार मिळाला नाही,तर यात्रेदरम्यान कचरा व्यवस्थापनाच्या पध्दतींनाही प्रोत्साहन मिळाले.
स्थानिक भागीदारांच्या सहकार्याने मैदान साफ उपक्रम हा कचरा व्यवस्थापन,पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे आणि मोठ्या सामुदायिक कार्यक्रमांमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या जबाबदार पध्दतींना प्रोत्साहन देत आहे.णेला सहकार्य करण्यात आले.
Comments
Post a Comment