केशव माधव विश्वस्त निधीतर्फेगुणवंत विद्यार्थ्यांचा*गौरव समारंभ
केशव माधव विश्वस्त निधीतर्फे
गुणवंत विद्यार्थ्यांचा
*गौरव समारंभ*
- शनिवार २५ जुलै रोजी एरंडवणे येथील छत्रे सभागृहात
पुणे
(प्रतिनिधी)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केलेल्या यंदाच्या इयत्ता दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गरीब व होतकरू असलेल्या चाळीस गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार समारंभाचे आयोजन *केशव माधव विश्वस्त निधी* या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
*केशव माधव विश्वस्त निधी* या संस्थेचे अश्या कार्यक्रम आयोजनाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे.
एरंडवणे येथील कर्नाटक शाळेसमोरील *छत्रे सभागृहा* मध्ये शनिवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास अध्ययन क्षेत्रात गेले पन्नास वर्षापासून योगदान देणारे हरिभाऊ धोंडो गोखले हे प्रमुख पाहुणे असणार असून अध्यक्षस्थानी केशव माधव विश्वस्त निधीचे अध्यक्ष रवींद्र जावळे हे असणार आहेत.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव अरविंद देशपांडे यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे विश्वस्त कविता शेंडे,अमोल जोशी,योगेश कुलकर्णी,प्रकाश देशपांडे,प्रशांत कुलकर्णी,संजय वळसंगकर प्रयत्नशील आहेत.
अधिक माहितीसाठी
*प्रकाश देशपांडे*
विश्वस्त,
केशव माधव विश्वस्त निधी
पुणे
९७६५६०८००९
-------------------
सोबत
निमंत्रण पत्रिका
..................................
शनिवार दिनांक २५ जुलै २६ च्या आपल्या दैनिकामध्ये
"स्थानिक कार्यक्रम" मध्ये प्रकाशित करण्यासाठी 👇🏻मॅटर
*केशव माधव विश्वस्त निधी* तर्फे
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून
शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ
शनिवार २५ जुलै २६
वेळ - सकाळी दहा वाजता
स्थान - छत्रे सभागृह,एरंडवणे
Comments
Post a Comment