राष्ट्रीय युवा कौशल्य दिनानिमित्तडॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‘जेनझी : यशाची नवी वाट’ या ६८व्या पुस्तकाचे प्रकाशन

राष्ट्रीय युवा कौशल्य दिनानिमित्त

डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‘जेनझी : यशाची नवी वाट’ या ६८व्या पुस्तकाचे प्रकाशन

 

पुणे : राष्ट्रीय युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक आणि तंत्रज्ञान अभ्यासक डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‘जेनझी : यशाची नवी वाट’ या ६८व्या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (दि.१५) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण होते. आयसरचे अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु. वा. जोशी, राष्ट्रीय अंध महासंघाच्या उपाध्यक्ष रिना पाटील मंचावर होते. ‘जेनझी : यशाची नवी वाट’ या पुस्तकाच्या ध्वनी आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले.

लेखनाविषयी बोलताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर समाधान न मानता संवादकौशल्य, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि संघभावना विकसित करावी.

डॉ. अरविंद नातू म्हणाले, आजच्या संभ्रमावस्थेत असलेल्या युवा पिढीला हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. करिअर म्हणजे पैसे अशा समजूतीतून बाहेर पडून करिअरची वेगळी व्याख्या यातून पुढे येत आहे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण झालेली आहे. फक्त या पिढीला योग्य दिशेकडे वळविणे गरजेच आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून युवा पिढीला उत्तम मार्गदर्शन, सुसूत्रविचार मालिका ओघवत्या भाषेत उपलब्ध झाली आहे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना योगेश सोमण म्हणाले, या पुस्तकातील विचार हे फक्त एका पिढीपुरते मर्यादित नसून प्रत्येक पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहेत. याचे लेखन अतिशय सोप्या भाषेत, सकारात्मक आणि हातात तंत्रज्ञान न घेतलेल्या व्यक्तीलाही उपयुक्त ठरेल.

डॉ. पराग काळकर म्हणाले, भविष्यकालीन संधींसाठी नव्या पिढीला हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल. करिअरच्या नवनवीन संधीची माहिती याद्वारे उपलब्ध होणार आहे.

ध्वनी आवृत्तीविषयी बोलताना रिना पाटील म्हणाल्या, डॉ. शिकारपूर यांनी सामाजिक भान जपत अंध व्यक्तींपर्यंत हे पुस्तक पोहोचवून तरुणाईला यशाची पाऊलवाट दर्शविली आहे.

सु. वा. जोशी यांनी बदलत्या काळात युवकांना दिशा देणाऱ्या साहित्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वडुस्कर यांनी केले तर आभार निलिमा जोशी-वाडेकर यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न