रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सोमवारी कवी हनुमंत चांदगुडे यांचा विशेष सन्मान

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सोमवारी कवी हनुमंत चांदगुडे यांचा विशेष सन्मान
 
पुणे : सुमारे २५ वर्षे निसर्ग कविता करणारे शेतकरी कवी हनुमंत चांदगुडे (सुपे, ता. बारामती) यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रम सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ समीक्षक, कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांच्या हस्ते चांदगुडे यांचा सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पावसावर आधारित ‘मल्हारधून’ हा कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात बंडा जोशी, माधव हुंडेकर, प्रभा सोनवणे, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, मिना शिंदे, प्रतिभा पवार, विजया गुळवणी, अनुराधा काळे, मृणाल जैन, डॉ. ज्योती रहाळकर, धनंजय तडवळकर यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न